भारतीय क्रिकेटपटू(Cricketer) युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, युजवेंद्र चहल त्याचे सहकारी क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग यांच्यासह सलमान खानच्या बिग बॉस १८ च्या सेटवर पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेही या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’ भागात बॉलिवूड सुपरस्टारसोबत सहभागी होणार आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तिन्ही क्रिकेटपटूंनी(Cricketer) पापाराझींसाठी एकत्र पोज दिली आहे. यादरम्यान, चहल त्याच्या सहकाऱ्यांसोबत हसताना आणि विनोद करताना दिसला आणि तो खूप आनंदी दिसला. चहलला आनंदी पाहून चाहते देखील आता आनंदी झाले आहेत. तसेच हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरंतर, काही दिवसांपूर्वी युजवेंद्र चहलने त्याची पत्नी धनश्रीचे फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट केले होते. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केले. यानंतर, चाहत्यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यास सुरुवात केली. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोकांनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. परंतु याबाबत दोघांनीही अद्यापही कोणतीही माहिती शेअर केली नाही आहे.
अलिकडेच, चहलचे आरजे महवशसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यानंतर नेटकऱ्यांनी असा अंदाज लावायला सुरुवात केली आहे की महवश ही त्याची मिस्ट्री गर्ल आहे का जी काही काळापूर्वी चहलसोबत दिसली होती. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये, चहल आरजे महवश आणि त्याच्या मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवताना दिसत आहे.
महवाशने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आणि कमेंट सेक्शन बंद केले. तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “क्रिसमस लंच कॉन फॅमिलिया.” युजवेंद्र चहलने डिसेंबर २०२० मध्ये नृत्यांगना आणि कोरिओग्राफर धनश्री वर्माशी लग्न केले. लग्नाच्या चार वर्षांनंतर, त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी आता जोर धरला आहे. या अफवांमुळे या जोडप्याचे चाहते चिंतेत आहेत.
हेही वाचा :
मार्क झुकरबर्गचा निर्णय Meta ला पडणार भारी!
शिंदे मुख्यमंत्री असतानाही नाराजच होते; हास्य हरवल्याच्या चर्चांवर फडणवीसांचं उत्तर!
Mumbai Local मध्ये मुलीने सर्व मर्यादा ओलांडल्या! Viral Video