सांगली लोकसभेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील(attack) यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची आज सभा होत आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत, रोहित आर आर पाटील, सुमनताई पाटील आदी नेते उपस्थित होते. या सभेत बोलताना चंद्रहार पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
“महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रयोग(attack) झाला आहे असं मला वाटतं. कारण माझ्या घराण्यात कोणीही आमदार खासदार नाही. माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली त्याचे आभार मानतो. आपलं दुर्दैव आहे की घटक पक्षातल्या लोकांनी बंडखोरी केली आहे. पण खरी चुरस भाजपच्या उमेदवाराबरोबर आहे,” असे चंद्रहार पाटील यावेळी म्हणाले.
तसेच “तुमची उमेदवारी ही तुमच्या संस्था आणि तुमचे घर वाचवण्यासाठी आहे. मात्र माझी उमेदवारी जनतेसाठी आहे. खरंतर आम्हाला लाज वाटते. वसंतदादा यांचे नाव मोठे आहे. मात्र त्यांचे नातू विशाल पाटील भाजपचे बी टीम म्हणून समाजासमोर उभे आहेत. भाजपचं पाकीट घेऊन पाकीट चिन्ह घेऊन ते महाविकास आघाडीसमोर उभे आहेत,” असा टोलाही चंद्रहार पाटील यांना लगावला.
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वातावरण उत्तम आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी लढाई करत आहे. राजकारणात प्रत्येकजण कायमचा असतो असं नाही आणि असले पाहिजे असेही नाही. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. पण सगळ्यांचा गैरसमज आहे की मीच उमेदवारी द्यायला लावली,” असे जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा :
सांगलीमध्ये भाजपाचे दोन उमेदवार, एक काका, दुसरे दादा…; राऊतांचा निवडणूक आयोगावरही घणाघात
टीम इंडियाचा वर्ल्ड कप जिंकण्याचा फॉर्म्युला तयार, पाहा संघाची ताकद काय?