महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा(Yojana) महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत खूप फायदा झाला आहे. परंतु आता लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची तपासणी होणार आहे. तपासणी झाल्यावर ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहे त्यांना योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, आमच्याकडे अनेक अर्ज आहेत की ज्यात त्यांनी स्वतः हून अर्ज बाद करण्यास सांगितले आहे. लग्न होऊ स्थलांतरित झालेल्या महिलांचा आधार नंबर चुकीचा असणे, सरकारी नोकरी असणे, यामुळे मी पात्र नाही, असं अनेक महिलांनी सांगितले आहेत. त्यामुळे सरसरकट सर्व अर्जांची फेरतपासणी होणार नाही.
लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थी महिलांचे अर्ज तपासले जाणार आहेत. त्यात सरकारी नोकरी असलेल्या किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्याचसोबत ज्या महिलांना पेन्शन मिळते, त्या महिलांनाही या योजनेचा(Yojana) लाभ मिळणार नाही.
या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. त्याचसोबत महिलांच्या कुटुंबातील कोणी जर आमदार किंवा खासदार असेल तर त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही, असंही आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
सध्या लाडकी बहीण योजनेवरुन अनेक चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, असं काहीही होणार नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. या योजनेत लवकरच महिलांना २१०० रुपये हप्ता दिला जाईल, असंही सांगण्यात येत आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर हे पैसे दिले जातील, असं सांगितलं जात आहे.
हेही वाचा :
राज्य सरकाराचा मोठा निर्णय; ४ हजार ८४९ एकर जमीन परत देणार, ९६३ शेतकऱ्यांसाठी मदत
OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; ‘त्या’ अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, परिसरात खळबळ
“…सोडून जाताना लाज वाटली नाही का?”; जितेंद्र आव्हाड ‘त्या’ नेत्यावर भडकले तरी का?