आज छगन भुजबळ-शरद पवार एकत्र येणार; यामागचं कारण काय?

आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त पुण्याजवळील चाकण येथील महात्मा जोतिराव फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमासाठी आमदार छगन भुजबळ(political news) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत.

महायुतीच्या मंत्रिमंडळ(political news) विस्तारात स्थान न मिळाल्याने आमदार छगन भुजबळ हे नाराज आहेत. तसेच त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे जाहीर सुद्धा केली आहे. मात्र त्यानंतर छगन भुजबळ हे भाजप पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या दरम्यान ते परदेशात गेले होते. तिथून परत आल्यावर आता शरद पवारांसोबत ते एकाच मंचावर असणार आहेत. परंतु, आता यावेळी ते काय भावना व्यक्त करतात, तसेच काय मत मांडतात व कोणावर निशाणा साधतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार आणि आमदार छगन भुजबळ यांच्यात भेट देखील झाली आहे. तसेच पक्ष फुटल्यानंतर छगन भुजबळांनी सत्तेत जाण्याचा निर्णय देखील घेतला. मात्र त्यावेळी ते अजितदादांसोबत गेले. पण त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले होते. याशिवाय उलट त्यांनी शरद पवारांबद्दल आदरभाव दाखवला आहे. मात्र आता महायुतीच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी जाहीर केली आहे.

दरम्यान, आज महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्यदिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र त्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर असणार आहेत. तसेच हा कार्यक्रम सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. यावेळी शरद पवारच नाही तर छगन भुजबळ देखील त्यांचं काय मत व्यक्त करतात याची सर्वत्र चर्चा होत आहे.

याशिवाय सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावात देखील आज कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. मात्र आता छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

पहाटे भूकंपाचा धक्का; 6.2 तीव्रतेने पृथ्वी हादरली

प्रस्थापित व्यवस्थेच…, राजकीय एन्काऊंटर!

नवीनवर्षात इंधनदरात मोठा दिलासा, पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?