हातकणंगलेसाठी मुख्यमंत्र्यांची रात्रभर खलबतं, सोमवारी गांधी मैदानात देणार बूस्टर डोस

जिल्ह्याच्या दौऱ्यांवर अचानक आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर(booster dose) जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची आढावा घेतली. हातकणंगलेबाबत उशिरापर्यंत खलबते सुरू होती. अपक्ष आमदारांच्या मध्यरात्री भेट घेऊन त्यांना आमदार प्रकाश आवाडे यांना थांबवण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आमदार विनय कोरे आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमवारी मुख्यमंत्री शिंदे महायुतीच्या दोन्ही उमदेवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी गांधी मैदानात उपस्थित राहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत.

येथील एका खासगी हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तब्बल पाच तास बैठक(booster dose) सुरू होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, समरजीत घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर आदी उपस्थित होते.

हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी उमदेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार असणाच्या धैर्यशील माने यांच्या प्रचारामध्ये काही अडचण येऊ नये, यासाठी आवाड़े यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी हातकणंगले मतदारसंघासाठी महायुतीमधील घटक पक्षांसोबत चर्चा केली.

हातकणंगलेमधील महायुतीच्या उमदेवाराला मताधिक्य मिळवण्यासाठी काही ठिकाणी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. त्रुटी जाणवतील त्या ठिकाणी तत्काळ दुरुस्ती करून लोकांपर्यंत पोचले पाहिजे, हातकणंगलेमध्ये जास्ती-जास्त मतदान देण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले जातील, असे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापूर मतदारसंघातही ज्या-त्या तालुक्यातील नेत्यांनी जास्ती-जास्त मतदानासाठी कार्यकर्तें सक्रिय करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्रानी दिल्या. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी.पाटील, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, समरजित घाटगे, भरत पाटील, आरपीआयचे शहाजी कांबळे, दलित महासंघाचे मच्छिंद्र सकटे, राहुल देसाई आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

करोडोंची कार सोडून बस ड्रायव्हर बनला रोहित शर्मा, Video Viral

६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार.. मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

सांगलीत नवा ट्वीस्ट! विशाल पाटील काँग्रेसच्या वतीनेच उमेदवारी अर्ज भरणार; ठाकरेंचं टेन्शन वाढणार?