नागरिकांनो काळजी घ्या उन्हाचा तडाखा, आणखी वाढणार तापमान

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यातील तामनात (temperature)पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा देखील वाढला आहे. उकाडा वाढल्यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. आता पुढच्या दोन दिवस राज्यातील तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसवर जाणार आहे. त्यामुळे उष्णतेत आणखी वाढ होणार आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हवामान तज्ज्ञ सुदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन दिवस तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस असणार आहे. उत्तर भारतामध्ये हवामान बदलामुळे तापमानात वाढ झाली आहे. साधारणपणे दोन दिवस उन्हाचा तडाखा असाच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (temperature)साधारणपणे १ ते २ टक्क्यांमध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढला; अंगाची अक्षरश: लाहीलाही, सर्वाधिक तापमान कुठे?
राज्यात सध्या दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढत असल्याने पाहायला मिळत आहे. साधारणपणे मार्च आणि फेब्रुवारीमध्ये तापमान वाढत असतं तर आता वाढलेले तापमान साधारण दोन-तीन दिवस असेच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. वाढते तापमान(temperature) लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे.

नागरिकांनो काळजी घ्या! उन्हाचा तडाखा आणखी वाढणार, तापमान ३५ अंश सेल्सिअसवरहवामानात मोठा बदल, ऐन हिवाळ्यात ७ दिवस पडणार धो-धो पाऊस, IMD ने काय इशारा दिला?एप्रिल- मे महिन्यामध्ये जाणवणाऱ्या कडक्याच्या उन्हाचा अनुभव राज्यातील जनता फेब्रुवारीमध्येच घेत आहे. मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा मोठा चढ-उतार सुरू आहे. सकाळी गारवा आणि दुपारी कडक्याचे ऊन असे हवामान पाहायला मिळत आहे. नंदुरबारमध्ये कमाल तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. तर पुण्यात ३५ ते ३८ अंशांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सातारा आणि कराडमध्येही तापमान ४० अंशांवर गेले आहे.

हेही वाचा :

‘या’ लाडक्या बहिणी अपात्र! आठवा हफ्ता मिळणार नाही

भारतात स्वस्तात मिळणार अमेरिकन बॉर्बन व्हिस्की

शरद पवार यांना भाजपकडून धक्का? अनेक वर्षे शरद पवारांसोबत असलेला नेते भाजपमध्ये जाणार