पुणे : राज्यात बारावी बोर्ड परीक्षा(exams) सुरु असतानाच आता आजपासून दहावी परीक्षा सुरु होत आहे. यंदा राज्यातील 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दिली आहे. याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव तोंडी परीक्षा देता आली नाही त्यांना ‘आऊट ऑफ टर्न’ या परीक्षेमार्फत त्यांची चुकलेली तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा 18 मार्च ते 20 मार्च या कालावधीत देता येणार आहे.

यावर्षी राज्यात १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी दहावीची परीक्षा(exams) देणार असून, यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० विद्यार्थी आणि ७ लाख ४७ हजार ४७१ विद्यार्थिनी आहेत. याशिवाय १९ तृतीयपंथी विद्यार्थीही यंदा दहावीची परीक्षा देणार आहेत. मुंबई विभागातून सर्वाधिक ३ लाख ६० हजार ३१७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर त्या खालोखाल पुणे विभागातून २ लाख ७५ हजार ४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा कोकण विभागातून सर्वात कमी २७ हजार ३९८ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.
कॉपीमुक्त अभियानातर्गत कॉपी करणाऱ्या आणि त्यात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा परीक्षेच्या काळात केंद्राच्या ५०० मीटर परिसरामध्ये सगळी झेरॉक्सची दुकानं बंद ठेवण्याचे आदेशही मंडळामार्फत देण्यात आले आहे.
पहिल्या दिवसापासूनच भरारी पथक सक्रिय राहणार आहे. ग्रामीण भागात, केंद्रप्रमुखांना बोर्डाने कडक सूचना जारी केल्या आहेत. जर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळले तर कठोर कारवाई होणार आहे. यंदा दहावी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा झाला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होत आहे. यंदा विभागातून 1 लाख 51 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 1 लाख 54 हजार 724 होती. यावेळी 3,353 विद्यार्थी कमी झाले आहेत. परीक्षेसाठी विभागात एकूण 682 केंद्रे आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 676 होती. विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र मिळावे, यासाठी केंद्रे वाढविले गेले आहेत.
यंदा मंडळ प्रथमच एक नवीन प्रयोग करून पाहणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना गृह केंद्रे मिळाली आहेत. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांसाठी केंद्रे वर्णक्रमानुसार निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे, सुमारे 20 ते 30 टक्के विद्यार्थ्यांना गृह केंद्रे मिळाली आहेत. बारावीप्रमाणेच दहावीच्या वर्गातही केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक बदलण्यात आले आहेत. परंतु सर्व केंद्रांवर ही व्यवस्था नाही.
हेही वाचा :
“आज की रात” गाण्यावर विद्यार्थिनीबरोबर शिक्षकाचा अश्लील डान्स Video Viral
‘शरद पवारांनी मला 4-5 वेळा…’; करूणा शर्मांचा पहिल्यांदाच मोठा खुलासा
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी