‘४ जूनला आमच्या शपथविधीला या’; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

देशात इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत(Minister) इंडिया आघाडीचं सरकार येत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी १० वर्ष सत्तेत आहेत. आता त्यांनी विश्रांती घ्यावी आणि आमच्या इंडिया आघाडीच्या ४ जूनच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला यांवं, असं आमंत्रण देत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना डिवडलं आहे. खुर्चीवर असताना त्यांना महत्त्व असतं खुर्ची गेली की त्यांना कोणी विचारत नाही म्हणून आज आमंत्रण देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एका जिद्दीनं महाराष्ट्राच नव्हे तर देश पेटलेला आहे. आमच्या इंडिया(Minister) आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला तुम्ही या हे निमंत्रण मी तुम्हाला आजच देतो आहे. हे निमंत्रण मी आज काय देतोय, तर खुर्चीवर माणूस बसलेला असतो तोपर्यंत त्याचं महत्व असतं नंतर त्याला कोणी विचारत नाही.

त्यामुळं मुद्दामून मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आपल्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलवायचं आहे. कारण त्यांना दाखवून द्यायचं आहे की आता खऱ्या अर्थानं ४ जून नंतर देशाचे ‘अच्छे दिन’ सुरु होत आहेत, असंही यावेळी ठाकरे म्हणाले.

मोदीजी आणि शाहाजी तुम्ही आम्हाला लुटलंत ते आता खूप झालं. तुम्ही ज्या प्रमाणं आमचे उद्योग लुटले आणि गुजरातला पळवलेत तसे आता तुम्ही देखील गुजरातला जा आणि तुमच्या घरात निवांत पडून राहा आणि तुम्हाला शांत झोप लागो अशा शुभेच्छा मी मोदी-शहांना देतो, अशा खोचक शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांवर हल्लाबोल केला.

हेही वाचा :

अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात

निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच खात्यात…

ठाकरे गटाला भाजप उमेदवाराच्या कार्यलयाबाहेरील राडा भोवला, 5 शिवसैनिकांना अटक

कोल्हापुरातील भीषण दुर्घटना; भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले