काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखविले काळे झेंडे

भंडारा जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे(political news) दाखवल्याची घटना घडली आहे. भंडारा येथील 547 कोटींच्या कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे भंडारा येथे दाखल झाले आहेत. आज वैनगंगा नदीवर भंडारा ते गोसेखुर्दपर्यंत जल पर्यटन निर्मिती होत असून आज या कामातील पहिला टप्पा भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडला.

या कार्यक्रमातनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(political news) सभामंडपी जात जात होते. याच वेळेस भंडारा शहरातील जिल्हा परिषद येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्री यांच्या निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, लोकसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विदर्भावर लक्ष केंद्रित केलं आहे. यातच भंडारा येथे 547 कोटी रुपयांचा कांमाचं भूमिपूजन करत विदर्भातील एकट्या भंडाऱ्या जिल्ह्याला मोठा निधी देत आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना मोठा निधी देत मतदारांनाही एक प्रकारे आकर्षित करण्याचा मानस यामधून दिसून येत आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष निवडून आलेले असून त्यांनी शिंदे गटाला समर्थन केलेले आहे.

नरेंद्र भोंडेकर यांनी आजच्या या भूमिपूजन सोहळ्यासोबत कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एक प्रकारे शक्ती प्रदर्शनही केलं. मुख्यमंत्री यांनी लोकसभेच्या निकालानंतर विदर्भाकडे लक्ष केंद्रित केले असून आगामी विधानसभामध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी तयारी करत आहे. तसेच ज्या जागा भाजपकडे नाही, त्या जागेवर शिवसेनेकडून उमेदवार उतरवता येईल का? याचा आढावाही मुख्यमंत्री शिंदे घेणार आहेत.

हेही वाचा :

मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी…’ के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला!

लग्न जुळत नसलेल्या व्यक्तींनी आजपासून ‘हा’ उपाय सुरू करा; महिन्याच्या आत आनंदाची बातमी मिळेल

कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्ग जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न