सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ भिजवलेल्या सुक्या मेव्याचे सेवन

रोजच्या आहारात सुक्या मेव्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. काजू, बदाम, पिस्ता, अंजीर इत्यादी पदार्थांचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासोबतच आरोग्य सुधारण्यास मदत होते. आरोग्यासाठी(health) सगळ्यात प्रभावी असलेला सुक्या मेव्यातील पदार्थ म्हणजे मनुके.

मनुके आणि मनुक्यांचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्यला (health)अनेक फायदे होतात. गोड पदार्थ बनवताना मनुक्यांचा वापर केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मनुके अतिशय प्रभावी आहेत.

सकाळी उठल्यानंतर मनुक्यांचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रिया सुधारते. शरीरातील अशक्तपणा कमी करण्यासाठी भिजवलेले मनुके खावेत. भिजवलेले मनुके नियमित खाल्यास शरीरातील हाडांना अनेक फायदे होतात. रात्री झोपण्याआधी अर्धा ग्लास पाण्यात १० मनुके भिजत घालून ठेवावे.

सकाळी उठल्यानंतर मनुक्यांच्या पाण्यासकट मनुकेसुद्धा खावेत, यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला भिजवलेले मनुके खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

भिजवलेले मनुके खाल्याने शरीराला होणारे फायदे:
अँटी-ऑक्सिडंट्सने परिपूर्ण:
मनुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आढळून येतात. यामुळे शरीराचे हानिकारक रॅडिकल्समुळे शरीराचे होणारे नुकसान टाळता येते. मनुक्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मनुक्यांचे सेवन करावे. भिजवलेले मनुके खाल्यामुळे अँटी-ऑक्सिडंट्स लवकर बाहेर पडून जातात. तसेच कर्करोगासारख्या हानिकारक पेशींपासून शरीराचा बचाव होतो.

हाडे मजबूत होतात:
मनुके खाल्यामुळे हाडांचे आरोग्य(health) सुधारते. हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन करावे. मनुक्यांमध्ये असलेले कॅल्शियम हाडांना पोषण देतात. मनुके हाडांना पोषण देतात. हाडांच्या वाढीसाठी मनुक्यांचे सेवन करावे.

यकृतासाठी फायदेशीर:
शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे यकृत. यकृताचे कार्य सुधारण्यासाठी भिजवलेले मनुके खावेत. भिजवलेले मनुके खाल्यामुळे रक्तशुद्ध होते आणि यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी हानिकारक आहे. विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी भिजवलेले मनुके खावेत. रात्रभर भिजवून ठेवलेले मनुके आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत.

वजन कमी होते:
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी इतर सुक्या मेव्याचे सेवन करण्याऐवजी मनुक्यांचे सेवन करावे. मनुके खाल्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील लठ्ठपणा कमी होतो. शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपाशी पोटी भिजवलेल्या मनुक्यांचे सेवन करावे. मनुके खाल्यामुळे लवकर भूक लागत नाही.

हेही वाचा :

वयानुसार एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर?; ‘ही’ आहे बदाम खाण्याची योग्य पद्धत

चहलकडून हवीये 60 कोटींची पोटगी? धनश्रीचे वकील सत्य सांगत म्हणाले, ‘या माध्यमातून धनश्रीची…’

पाकिस्तानपेक्षा चांगल तर…’ भारत पाक सामन्यापूर्वी इरफान पठाणने केलेल्या वक्तव्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ