“नक्कल करायलाही अक्कल पाहिजे, जी…” नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात(copying machine) महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली असून, या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

नाना पटोले यांनी म्हटले की, “लाडकी बहीण योजना सारख्या योजना(copying machine) आमच्याच होत्या. अशा पाच योजनांची गॅरंटी आमचे नेते राहुल गांधी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेल्या होत्या. सत्तेतले सरकार आमचीच नक्कल करायला निघाले आहे. मात्र, नक्कल करायला पण अक्कल पाहिजे जी अक्कल या सरकारमध्ये नाही.”

पटोले पुढे म्हणाले, “महिला भगिनी पहिलेच महागाईच्या बोझ्याखाली आहेत. गेल्या दहा वर्षापासून सरकारने मिळून जनतेला लुटले आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आपल्याला मतं घेण्यासाठी हा केलेला त्यांचा एक प्रयत्न आहे.”

“हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये असे प्रलोभन देणारी मानसिकता निवडणुकीच्या तोंडावर देऊन सत्ताधीश होण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र जनता त्यांना चांगलं ओळखून आहे. त्यांचे उत्तर ऑक्टोबरच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता देणार आहे,” असे नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची गरजही व्यक्त केली. “भाजपने मराठा, धनगर, गोवारी, हलबा समाजाच्या वापर केला. आज तोच समाज यांना प्रश्न विचारतोय, त्याचे उत्तर त्यांच्याजवळ नाही,” असे पटोले म्हणाले.

“आम्ही सांगतो विश्वासाने की केंद्रात आमचं सरकार आलं असतं तर जातीनिहाय जनगणना सुरू झाली असती आणि मागाससह सर्व जातींकरिता आरक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देता आले असते,” असेही त्यांनी स्पष्ट केले. नाना पटोले यांनी शिंदे समितीच्या हैदराबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केले.

हेही वाचा :

गुन्ह्यातील संशयित आरोपींची तुरुंगातील गर्दी कमी होणार?

नोकियाची धमाकेदार एन्ट्री! कीपॅडचा जबरदस्त 5G स्मार्टफोन लाँच केला 

वरळी हिट अँड रन प्रकरण; ती भरधाव कार शिंदे गटातील बड्या नेत्याची