पुजेच्या थाळीतील बदाम उचलल्याने जैन मंदिरातील पुजाऱ्याची मुलाला झाडाला बांधून बेदम मारहाण

jain Temple

गाला ‘अहिंसा परमो धर्मः’ची शिकवण देणाऱ्या जैन(jain) धर्माच्या पुजाऱ्याने एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

मंदिरातील थाळीत ठेवलेले बदाम उचलल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याच्या अंगावर मारहाणीचे वळ स्पष्ट दिसत आहेत. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सागर जिल्ह्यातील करिला भागात असणाऱ्या जैन मंदिरामध्ये(jain Temple) एक 11 वर्षीय मुलगा घुसला आणि त्याने थाळीत ठेवलेले खाण्यासाठी उचलले. यामुळे मंदिराचा पुजारी भडकला आणि त्याने मुलाला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याला झाडालाही बांधून ठेवले. यावेळी मुलाने ‘काका मला वाचवा’ असा टाहो फोडला होता.

सागर जिल्ह्यातील मोतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील जैन सिद्धायत मंदिरात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पीडित कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर शुक्रवारी रात्री आरोपी पुजारी राकेश जैन याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुजाऱ्याने मुलावर पुजेच्या थाळीतील बदाम चोरल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, मोतीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश सिंह (Satish Singh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा मंदिराच्या गेटजवळ उभा असताना पुजाऱ्याने त्याच्यावर बदाम चोरीचा आरोप करत त्याला मारहाण केली. पुजाऱ्याने एका व्यक्तीच्या मदतीने त्याला झाडाला बांधले आणि बेदम मारहाण केली.

Smart News:-