मिरज: कमी कर्ज मंजूर केल्याच्या कारणावरून बँकेच्या मॅनेजरला मारहाण : चौघावर गुन्हा

bank manager

मिरज: लाख रुपये कर्ज मिळावे यासाठी अर्ज केला असताना केवळ चार लाख रुपये का मंजूर केले ? या कारणावरून चौघांनी बँक मॅनेजरला मारहाण केली. सदरची घटना मिरजेच्या मालगाव तालुक्यातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडली. याप्रकरणी शाखेचे मॅनेजर(bank manager) राघव अमरेंद्र कुमार ( वय ३७ रा. मूळ फेंग्लास सुपौल, बिहार सध्या माळी मंगल कार्यालयाजवळ, सांगली) यांनी मारहाण करणाऱ्या चौघां विरोधात  मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मालगाव येथील थामसेना रामचंद्र नाईक (वय ३१) यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून २५ लाख रूपये कर्ज पाहिजे म्हणून अर्ज केला होता.

अर्जातील २५ लाख रूपयांपैकी फक्त ४ लाख रूपये कर्ज मंजूर झाले. कर्ज इतके कमी का मंजूर केले ? याचा राग मनात धरून थामसेन नाईक, आशा रामचंद्र नाईक (वय ३०), देवी रामचंद्र नाईक (वय २९), रोमिया रामचंद्र नाईक (वय २७) हे सर्व (रा. मालगाव पाण्याच्या टाकी) या सर्वांनी मॅनेजरच्या(bank manager) केबीनमध्ये घुसून राघव कुमार यांना मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करण्यात आलेल्या बँके च्या इतर कर्मचाऱ्यांना देखील चौघांनी धक्काबुक्की केली. मॅनेंजरला बाहेर काढा, त्याला बघतोच अशी धमकी दिली. बँकेतील शासकीय कामात अडथळा व मॅनेंजरला मारहाण प्रकरणी चौघांविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Smart News:-