महाराष्ट्र हादरला! सख्ख्या भावाकडून लहान बहिणीचे शोषण, सहा महिन्याची गर्भवती राहिली अन्…

मागील काही दिवसांपासून समाजात वेगवेगळ्या प्रकारच्या विकृत घटना घडताना दिसत आहे. मोबाईल आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा परिणाम युवकांच्या मनावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशातच वर्धेत एक धक्कादायक घटना घडली आहे. (crime invistigation) वर्धा शहरात सख्ख्या भावानेच बहिनीचे शोषण केल्याची खळबळजनक धक्कादायक घटना उजेडात आली आहे.

पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले असता पीडिता ६ महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. भारतीय संस्कृतीत काही नाती खूप पवित्र मानली जातात. त्यामध्ये आई-मुलगा व बहीण भावाचे नाते सामील आहे. मात्र, वर्धा शहरात मानवतेला कलंकित करणारे प्रकरण समोर आले आहे.(crime invistigation)

सख्या भावाने बहिणीवर अत्याचार करण्याची लाजीरवाणी घटना घडली. १५ वर्षीय पीडिता घरी होती. तिचे आई-वडिल बाहेर कामानिमित्त गेले होते. याची संधी साधून नराधम १७ वर्षीय भावाने बहिनीचे शोषण केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला घरच्यांनी सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उजेडात आल्याने घरच्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली. शहर पोलीस ठाण्यातील पोस्को सेलने घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेच्या भावाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

पीडिता सहा महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पीडितेची विचारपूस केली असता पीडितेने बयाण देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. पीडिता माहिती देण्यास टाळाटाळ करीत होती. यामुळे हे प्रकरण सखी वन स्टॉप सेंटरकडे सोपविण्यात आले. सेंटरच्या केंद्र प्रशासक यांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. तिला धीर देत विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार पानावलेल्या डोळ्यांनी कथित केला. पीडितेचे बयाण नोंदविल्यानंतर शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

सख्ख्या बहिनीचे शोषण केल्याच्या धक्कादायक प्रकरणात शहर पोलिसांनी विकृत असलेल्या १७ वर्षीय भावाला ताब्यात घेतले. त्याचेही बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :


विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागांत ओला दुष्काळ जाहीर करा : अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Leave a Reply

Your email address will not be published.