“नराधमाला फाशी झालीच पाहिजे”; मुळशीत आक्रोश

पवन मावळातील कोथूर्णे गावातील एका सात वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या बाबत कामशेत पोलिसांनी तपासाची सुत्रे हलवत 24 तासाच्या आत आरोपीला जेरबंद करण्यात आले; मात्र या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता पौड (ता.मुळशी) येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थिनीच्या हस्ते (crime reports) पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ आणि तहसीलदार कार्यालयाच्या वतीने छाया सानप यांनी स्वीकारले.

राजकीय पुढाऱ्यांनी आतापर्यंत मोर्चे काढले; (crime reports) मात्र आज व्यापारी संघ पौड, पौड ग्रामपंचायत आणि पौड ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चात श्री छत्रपती शिवाजी विद्यालय पौडच्या विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

crime reports

नराधमाने लहान बालिकेवर केलेल्या अत्याचाराला वाचा फुटली पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. वेगवान निकाल लागला पाहिजे असे बंडू दातीर यांनी आपले मत व्यक्त करत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पौडच्या प्रभारी सरपंच मोनाली ढोरे, माजी सभापती उज्वला पिंगळे, युवासेना संघटक संकेत दळवी, वकील सागर ढोरे, व्यापारी संघाचे संस्थापक विशाल राऊत, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, अजय कडू, प्रशांत वाल्हेकर, प्रीती आगनेन, रसिक जोशी, नंदा नवले, पोलिस पाटील संजय पिंगळे, भाजपाचे उत्तमचंद आगरवाल, श्री छञपती शिवाजी विद्यालय पौडचे मुख्यध्यापक संतोष भोकरे, अनिल काळभोर, एस. पी. पाटील, बाळासाहेब इप्ते, शुभम भोसले, रोहित उबाळे, महिंद्र उबाळे, राजेंद्र ओंबळे, इम्रान मुलाणी, संजय गुरव, दशरथ चव्हाण, संदीप शेडगे, निखील रूकर, शामराव नवले, रोहित कुंभार, कैलास पवार, धनशाम उबाळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :


इचलकरंजी: सूत – कापसाच्या दरामध्ये अचानक उसळी

Leave a Reply

Your email address will not be published.