इचलकरंजीत महिलेच्या हातातील तब्बल ४ लाखांची रोकड लांबवली

इचलकरंजीत धूम स्टाईलने (crime invistigation) महिलेच्या हातातील ४ लाखांची रोकड असलेली पिशवी मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी लांबवली. हा प्रकार आज (दि.२५) हवामहल बंगला रोडवर घडला. शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगीता सुरेश टाकवडे (रा. तारदाळ) जाणता राजा नावाचा बचत गट चालवतात. या बचत गटासाठी मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम घेण्यासाठी त्या (crime invistigation) इचलकरंजी येथे आल्या होत्या. ३ लाख ८२ हजारांची रोड असलेली पिशवी हातात घेऊन त्या हवामहल बंगला रोडवर थांबल्या होत्या.

यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या हेल्मेटधारी दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी हिसडा मारून लांबविली. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे दाखल झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.

हेही वाचा :


अरेरे…! 33 लाखांची नोकरी मिळूनही भारतीय तरुणाची ही संधी हुकलीच

Leave a Reply

Your email address will not be published.