सामूहिक बलात्कारप्रकरणी माजी आमदार पुत्राला पुण्यातून अटक;

MLA son

उत्तर प्रदेशात तरुणीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी समाजवादी पार्टीच्या माजी आमदाराच्या मुलाला(MLA son) वाराणसी तसेच हडपसर पोलिसांनी पुण्यात अटक केली. हा आरोपी गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत हडपसर येथे एका उच्चभ्रु सोसायटीत वास्तव्यास होता.

त्याच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी लाखाचे बक्षीस ठेवले होते.

विष्णू मिश्रा (वय 34) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वडील विजय मिश्रा हे उत्तरप्रदेशातील भदोईचे आमदार(MLA) होते. सामूहिक बलात्कारप्रकरणी तपास सुरू असताना मिश्राचे नातेवाईक पुण्यात राहत असल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाली होती.

दहा दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. त्यानंतर हडपसर पोलिसांच्या मदतीने पोलीस पथकाने विष्णू मिश्रा याला अटक केली. त्याला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) दिली. त्यानंतर त्याला घेऊन पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशात रवाना झाले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, निखील पवार, भगवान हंबर्डे, सोनवणे तसेच वाराणसी पोलिसांच्या विशेष पथकातील सहायक आयुक्त शैलेश सिंग, पोलीस निरीक्षक श्रीवास्तव, उपनिरीक्षक अंगद यादव, हवालदार राहुल सिंग यांनी ही कारवाई केली.

Smart News:-

देशाच्या घटनेला संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव- मुझफ्फर हुसैन


‘फ्युजन आवडत नाही… ‘ विरोध करणाऱ्यांना राहुल देशपांडे यांनी सुनावले


प्रगती एक्सप्रेसचा विस्टाडोम कोचद्वारे प्रवास सुरू


इलॉन मस्क आणि गुगलचे सह-संस्थापक सर्गी ब्रिन यांच्या पत्नीचे प्रेम प्रकरण? मस्कने केला इन्कार मात्र…


Leave a Reply

Your email address will not be published.