सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर (Gangster) गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला कॅलिफोर्निया येथून अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतच वृत्त दिलं आहे. मात्र, गोल्डच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

२९ मे रोजी सिद्धू मुसेवाला याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या  करण्यात करण्यात आली होती. पंजाबमध्ये ही थरारक घटना घडली होती. यामध्ये मुसेवाला याचा जागीच मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली होती.

या संपूर्ण कट आखण्याचं काम गोल्ड ब्रार या (Gangster) गँगस्टरनं लॉरेन्स बिश्नोईच्या साथीनं केलं होतं. मुसेवालाच्या हत्येचं संपूर्ण प्लानिंग गोल्डी ब्रारनं केलं आणि शूटर्सच्या मदतीनं सिद्धू मुसेवालावर हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ३४ जणांना आरोपी केलं आहे.

कोण आहे गोल्डी ब्रार?

गोल्डी ब्रार हा मुसेवाला हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड मानला जातो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडात बसून गोल्डी मुसेवाला या प्रकरणातील सर्व सूचना देत होता. हत्येनंतर लगेचच गँगस्टर गोल्डी ब्रार याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. इंटरपोलने ब्रार यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. गोल्डी ब्रारवर हत्या, गुन्हेगारी कट, बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा पुरवठा असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, यापूर्वी सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी गोल्डी ब्रारला अटक न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. जो कोणी गोल्डीचा पत्ता सांगेल, त्याची जमीन विकून त्याला दोन कोटी रुपये देऊ, असे त्यांनी म्हटलं होतं. याच्या एका दिवसानंतर गोल्डीच्या अटकेची बातमी समोर आली आहे. मात्र, याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत.

हेही वाचा :