हिंदू वेशात मुस्लीम तरुणांकडून 3 दर्ग्यांमध्ये तोडफोड; वातावरण बिघडवण्यासाठी रचला मोठा कट

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील शेरकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सख्ख्या मुस्लीम भावांनी तीन दर्ग्यांवर गोंधळ घातला. यादरम्यान वातावरण (environmental issues) चिघळण्यापासून थोडक्यात वाचले. त्यांनी कबरीवरील चादरी आणि पडदे जाळले आणि राखेचा ढीग केला. या प्रकरणात कमल आणि आदिल या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्ह्याचे डीएम आणि एसपी परिसरात तळ ठोकून आहेत.

जिल्ह्यातील शेरकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे, ज्यात दोन मुस्लीम बांधवांनी तीन धर्मस्थळांवर गोंधळ (environmental issues) घातला. जिल्ह्यातील वातावरण खराब करण्यासाठी त्यांनी हे सर्व केलं. कमल आणि आदिल या दोन सख्ख्या भावांनी तीन ठिकाणी दर्ग्यात जात मजारचं नुकसान केलं. त्यांनी याठिकाणची चादर आणि पडदे जाळून राख केले.

 

परिसरातील लोकांनी हे सगळं पाहिलं आणि पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कमल आणि आदिल या दोन्ही भावांना अटक केली. घटनेची माहिती मिळताच डीएम उमेश मिश्रा आणि एसपी दिनेश सिंह यांनी घटनेचा आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस दोन्ही भावांची कसून चौकशी करत असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या तोडफोडीमागील नेमकी कारणं काय याचा शोध पोलीस चौकशीत घेत आहेत. हे दोघे भाऊ पकडले गेले नसते तर जिल्ह्यातील स्थिती वेगळी असती, हे निश्चित.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले, “शेरकोट पोलिसांनी मोठी घटना घडण्यापासून रोखली. पोलिसांना ही माहिती पाच वाजण्याच्या सुमारास मिळाली की जलाल शाह मजारवर तोडफोड करून चादरी जाळण्यात आल्या आहेत. यावर कडक कारवाई करत पोलीस तपास करेपर्यंत त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुरेशहा मजारवर तोडफोड झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे पोहोचून तिथेही कारवाई केली.

पोलिसांनी सांगितले की, कमल आणि आदिल अशी या दोन व्यक्तींची नावे आहेत. हे दोघे सख्खे भाऊ आहेत. या दोघांनी डोक्यावर भगव्या रंगाचा पट्टा बांधला होता आणि त्यांनी ही तोडफोड केली. कावड यात्रेदरम्यान हे सर्व घडवून जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली. सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Smart News :


RBI ची मोठी कारवाई! ‘या’ ४ बड्या बँकांवर लादले निर्बंध; पैसे काढण्यावरही मर्यादा

Leave a Reply

Your email address will not be published.