पैशांची गादी करून झोपायचा व्यावसायिक

आयकर आणि ED टीम सध्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत आहे. ED ने नुकतीच (professional image) पश्चिम बंगालमध्ये ६ ठिकाणी ही छापेमारी केली. गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणी ED वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र सुरू केलं आहे.

एका व्यवसायिकाच्या घरातून जवळपास ७ कोटी रुपयांची रक्कम ED ने ताब्यात (professional image) घेतली आहे. कोलकातामध्ये ३ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मोबाईल गेमिंग फ्रॉड प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हे पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना कॅश मोजण्याची मशीन मागवावी लागली. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक निसार खान याच्या घरी धाड टाकली. व्यावसायिकाच्या घरी पलंगाखाली ५०० आणि २ हजारच्या नोटांचं घबाड सापडलं आहे.

निसार खान यांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ED कडून या पैशासंदर्भातील चौकशी सुरू आहे. अजून काही ठिकाणी धाडसत्र सुरू आहे.

Smart News  :