beating: पत्नीला भेटायला जाणं पडलं महागात…!

beating

पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला माझ्या मुलीला नेहमीच का त्रास देता. तिला तुमच्यासोबत पाठवणार नाही, असं म्हणत मेहुणा आणि सासऱ्याने मारहाण(beating) केल्याची घटना घडली. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वरुड येथे ही घटना घडली आहे. जावई लक्ष्मण कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणा कृष्णा सडाळ आणि सासरा विष्णू ग्यानोजी सडाळ यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण बालासाहेब कदम हे पत्नी आणि मुलांना घरी घेऊन येण्यासाठी वरुड येथे सासरी गेले होते. त्यावेळी त्यांचे सासरे विष्णू ग्यानोजी सडाळ म्हणाले, माझ्या मुलीला नेहमीच का त्रास देता. तिला तुमच्यासोबत पाठवणार नाही. याच वादातून सासरे आणि मेहुणा कृष्णा विष्णू सडाळ यांनी लक्ष्मण कदम यांनी शिवीगाळ केली. लाथा-बुक्क्याने आणि काठीने मारहाण(beating) केली.

मुलीला घेण्यासाठी आलात तर जीवे मारू, अशी धमकीही सासरच्यांनी जावई लक्ष्मण कदम यांना दिली, अशी माहिती कदम यांनी दिलेल्या तक्रारीत आहे. त्यावरून जिंतूर पोलीस ठाण्यात मेहुणा कृष्णा सडाळ आणि सासरे विष्णू ग्यानोजी सडाळ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :


ipl: Ambati Rayudu ने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करताच

Leave a Reply

Your email address will not be published.