मम्मी, तू लवकर घरी ये! दत्तू मामा माझा हात धरतोय!! अन्…

आई-वडील खरेदीसाठी बाजारात गेले. हीच संधी साधून नराधमाने चिमुकलीच्या घरात प्रवेश केला. लहान भावाला पैसे देऊन दुकानात पाठवले. सातवीत शिकणाऱ्या १२ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. (police report) मुलीने प्रसंगावधान राखत आईला फोन केला. याच एका कॉलमुळे नराधमाच्या तावडीतून चिमुकलीची सुटका करत त्याची यथेच्छ धुलाई नागरिकांनी केली. ही धक्कादायक घटना वाळूज भागात घडली. दत्तू तांबे (रा.वाळूज, ता. गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित चिमुकलीच्या पाच वर्षीय लहान भावाचा वाढदिवस असल्याने आई-वडील, आजी हे बाजारात खरेदीसाठी गेले होते. दरम्यान पीडिता आणि तिचा लहान भाऊ असे दोघेच घरात होते. दरम्यान घराशेजारील दुकानात कामाला असलेल्या आरोपी दत्तू तांबेने चिमुकलीच्या आजीला कॉल करून बाजारात असल्याची खात्री करून घेतली आणि तो पीडितेच्या घरात घुसला. त्यानं लहान भावाला पैसे देऊन दुकानात पाठवले व पीडितेसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.

पीडितेने प्रसंगावधान राखत ओक्साबोक्सी रडत दत्तू मामा हात धरत आहेत तुम्ही लवकर या असे कॉल करून आईला सांगितले. यानंतर आई-वडिलांनी त्वरित घर गाठले. तेव्हा आरोपी दत्तू घरातच होता. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी आरोपीचा तावडीतून चिमुकलीची सुटका करून त्याला बदडून काढत पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी वाळूज पोलीस (police report) ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :


सांगली जिल्ह्यात शिवसेना-एकनाथ शिंदे गटात संघर्ष, प्रवेशासाठी ऑफर?

Leave a Reply

Your email address will not be published.