वाळू तस्करांच्या ट्रॅक्टरने महिलेला चिरडलं! आईला गमावल्यानं हळहळ

भंडारा जिल्ह्यात 32 वर्षांच्या महिलेचा  दुर्दैवी अंत झाला आहे. एका वाळू तस्करी  करणाऱ्या वाहनानं या महिलेला चिरडलं आणि तिचा जागीच जीव गेला. या घटनेनं संपूर्ण भंडाऱ्यात संताप (anger) व्यक्त केला जातो आहे. ही महिला शेतीचं काम आटोपून घरी जाण्यासाठी निघालेली होती. पण वाटेतच तिच्यावर काळानं घाला घातला. भंडारा जिल्ह्यामधील लाखनी तालुक्यात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात संताप  व्यक्त केला जातो आहे.

तर अपघातानं घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. 32 वर्षीय महिलेच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर अपघात चिरडलेल्या महिलेला तातडीनं रुग्णाल यातही पाठवण्यात आलं. पण तिथं तिला मृत घोषित केलं गेलं. या महिलेच्या मृत्यूमुळे तिची दोन मुलं पोरकी झाली आहेत. तर मृत महिलेच्या पतीलाहा मोठा धक्का (anger) बसलाय.

नेमका कुठे जाला अपघात?
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथे ही घडली. दिशा सुरेश कांबळे, वय 32 वर्ष, राहणार मोगरा, असं मृत महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या पती आणि दोन मुलांसह राहत होती. या अपघातात दोन मुलांनी आपल्या आईला गमावलंय. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.

वाळू तस्करांचा धुडगूस
मुरमाडी/तूप परिसरातून चुलबंद नदी प्रवाहीत होते. या नदीत पांढरी शुभ्र व बारीक वाळू असून या वाळूची मागणी अधिक असल्याने तस्करी ही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यातून अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचण्यासाठी वाळू तस्कर वेगाने गाडी चालवत असतात. यातून अपघातही वाढले आहे. असाच प्रकार लाखनी येथे घडला.

पळसगाव येथील एका वाळू तस्कराचा मालकीचा ट्रॅक्टर अवैध रेती भरून भरधाव वेगाने मुरमाडी/तूप कडून मोगराकडे जात होता. या दरम्यान, ट्रक्टर चालकाचं नियंत्रण सुटलं. रोवणी आटोपून घराकडे परतणाऱ्या महिलेला भरधाव ट्रॅक्टरने चिरडलं आणि त्यात महिला जागीच ठार झाली. या अपघाताची माहिती होताच परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले. अपघाताची माहिती लाखनी पोलिस आणि लाखनीचे तहसीलदार यांना देण्यात आली. त्यांनीही घटनास्थळ गाठत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी लाखनी रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेनंतर वाळू तस्कराच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.

Smart News :


टीम इंडियाच्या आनंदावर पाणी फेरणारं वृत्त, आयसीसीनं ठोठावला सर्व खेळाडूंना दंड!

Leave a Reply

Your email address will not be published.