जवानाने आपल्याच सहकाऱ्यावर झाडली गोळी; केली आत्महत्या

state reserve soldier

माओवाद्यांशी दोन हात करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानाने (state reserve soldier) अंतर्गत वादातून आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे.

जवानांवर गोळी झाडल्यानंतर या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्य राखीव दलात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतिदुर्गम अतिसंवेदनशील मरपल्ली पोलीस ठाण्यात बॅरकमध्ये ही घटना घडली आहे. श्रीकांत बेरड आणि बंडु नवतरला अशी मृत झालेल्या जवानांची नाव आहे.

पुण्याहून हे जवान गडचिरोलीमध्ये तैनात झाले होते. राज्य राखीव दलाच्या(state reserve soldier) जवानामध्ये अंतर्गत वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. श्रीकांत बेरड आणि बंडु नवतरला यांच्यामध्ये अंतर्गत वादातून भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात रायफलमधून श्रीकांत बेरड याने बंडू नवतरला यांच्यावर गोळी झाडली.

यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर श्रीकांत यांनी स्वत:च्या बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. दोघेही दौंड पुणे येथील SRP कॅम्पचे जवान होते. (एअरपोर्टवर घडलं असं काही की नेहा कक्कर धावली मदतीला!

IIFAसाठी निघाली होती दुबईला) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दोन्ही जवानांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या घटनेमुळे राज्य राखीव दलात खळबळ उडाली आहे.

Smart News:-

जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल, तर बारावीचा दुसऱ्या आठवड्यात निकाल


मोठी बातमी: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींनी दिला राजीनामा!


सांगलीचा तरुण हनीट्रॅपमध्ये अडकला अन्…


धनंजय मुंडेंचे अन्य महिलांशीही अनैतिक संबंध; करुणा शर्मांचे गंभीर आरोप!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *