विषारी दारू प्यायल्याने 8 जणांचा मृत्यू, 12 जणांची दृष्टी गेली

बिहारच्या  छपरा येथे एक धक्कादायक घटना घडलीयं. येथे बनावट दारूमुळे  मृत्यू झालेल्यांची संख्या 8 झाली आहे. इतकेच नव्हेतर बनावट दारूमुळे तब्बल 12 जणांची दृष्टी देखील गेलीयं. बनावट दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती खालावत आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.हा आकडा वाढण्याची चिंता व्यक्त केली जातंय. बुधवारी मेकर पोलीस  स्टेशन हद्दीतील धानुक टोली गावातील ही घटना आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाचे पथक गावात पोहोचले. याठिकाणी तपास (crime scene investigation) केला असता पीडितांनी वेगवेगळ्या ठिकाणी बनावट दारू  पिल्याचे समोर आले. बुधवारी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना छपरा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

डीएम आणि एसपी स्वत: रुग्णालयात पोहचून केली रूग्णांची विचारपूस
गुरुवारी डीएम आणि एसपी स्वत: रुग्णालयात पोहोचले होते. एम राजेश मीना यांनी बोलताना सांगितले की, घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने (crime scene investigation) आरोग्य विभागाची टीम गावात पाठवली आणि आजारी लोकांना रुग्णालयात आणले गेले. आजारी व्यक्तींच्या उपचारासाठी आरोग्य विभाग सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले. दारु तस्करांना पकडण्यासाठी परिसरात छापेमारी देखील सुरू आहे.

बनावट दारू पिल्याने आता 8 जणांचा मृत्यू तर 12 जणांची दृष्टी गेली
2 ऑगस्ट रोजी पानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट दारू पिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी करत होते. त्यानंतर आणखी एक घटना समोर आली आहे. खरे तर बिहारमध्ये दारूबंदी कायदा आहे, मात्र असे असतानाही राज्यात दारूची विक्री सुरू आहे.

अवैध दारूविक्री बंदीवर शासन आणि पोलिसांचा वचक राहिला नाही
बरेच लोक दारू पिण्यापासून स्वत: ला रोखू शकत नाहीयंत. परिणामी अनेकवेळा लोक विषारी दारूचे सेवन करतात, त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतोयं. दारूबंदीनंतर राज्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. विषारी दारूच्या सेवनाने लोकांचा दररोज मृत्यू होत आहे. अशा स्थितीत अवैध दारूविक्री बंदीवर शासन व पोलीस प्रशासनाचे लक्ष देऊन हे थांबवणे आवश्यक झाले आहे.

Smart News :


केसांना डाय किंवा कलर केल्याने होते अ‍ॅलर्जी? हे उपाय करून मिळवा आराम

Leave a Reply

Your email address will not be published.