“नरेंद्र मोदी ४ जूननंतर पंतप्रधान नसतील. ते झोला घेऊन हिमालयात जातील(political news), की त्यांनी व अमित शहा मिळून जी ‘कांडे’ देशात केली त्याबद्दल त्यांना न्यायालये, चौकशी आयोगासमोर खेटे मारावे लागतील ते सांगता येत नाही”, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
“मोदी जाता जाता जी भाषणे आणि वक्तव्ये करीत आहेत(political news), ती त्यांच्या निराश-हताश मानसिकतेची लक्षणे आहेत. मोदी यांनी स्वतःला प्रचारात गुंतवण्यापेक्षा त्वरित वैद्यकीय उपचार करून घेणे गरजेचे आहे”, असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
“नरेंद्र मोदी यांची प्रकृती बरी नाही. त्यांना योग्य उपचारांची गरज आहे. मोदींनी वेळीच विश्रांती घेतली नाही तर भाजप 100 आकडाही पार करणार नाही. मोदी ब्रॅण्ड पूर्णपणे संपला आहे”, अशी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली.
“मोदी यांनी अदानी-अंबानींचा काळा पैसा काँग्रेसकडे जात असल्याचे सांगून टाकले. हे पंतप्रधानांचे स्टेटमेंट आहे. त्यामुळे ईडी, सीबीआयने याच स्टेटमेंटच्या आधारे दोन्ही उद्योगपतींवर कारवाई करायला हरकत नाही. मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला केला, पण मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारून स्वतःलाच संकटात टाकले”, असा घणाघातही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला.
“अंबानी-अदानी वगैरे उद्योगपती काँग्रेसला टेम्पो भरभरून काळा पैसा देत आहेत व त्याच पैशांवर राहुल गांधी निवडणुका लढत आहेत, असे मोदी सांगत आहेत. ते पंतप्रधान आहेत. त्यामुळे काळ्या पैशांचे हे असे ‘मनी लाँडरिंग’ करणाऱ्या या उद्योगपतींना ‘पीएमएलए’ कायद्यानुसार लगेच अटक करून तुरुंगात टाकायला हवे, पण मोदी असे काहीच करत नाहीत”, अशी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली.
“मोदी ब्रॅण्डचे हे अधःपतन व घसरण आहे. अखेर राहुल गांधी यांनी मोदी यांना गुडघ्यावर आणले. काळ्या पैशांचा स्रोत नक्की कोठे आहे, याचा खुलासा करण्यास भाग पाडले. झोला घेऊन हिमालयात जाण्याची वेळ आणि मुहूर्त मोदींनी मुक्रर केला हे स्पष्ट झाले”, असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलंय.
हेही वाचा :
‘तू कसा आमदार होतो तेच बघतो’, अजित दादांचे थेट आव्हान
निकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता परिक्षा…
कोल्हापूर : अबब! 500 पासून ते लाखांपर्यंतच्या पैजा; निकालानंतर कुणाचा खिसा गरम होणार तर कुणाचा खाली…