महाविकास आघाडीमध्ये वार पलटवार; ‘ती’ टीका लागली कॉंग्रेसच्या जिव्हारी, वडेट्टीवारांनी दिले प्रत्युत्तर

नागपूर : राज्यामध्ये विधानसभा(political updates) निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीचा निकाल लागून दीड महिना झाला असून नेत्यांच्या नाराजीचा पूर आला आहे. महायुतीमध्ये खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्तारामुळे नाराजी आहे. तर महाविकास आघाडीमध्ये दारुण पराभव झाल्यामुळे आरोप प्रत्यारोप केले जात आहे. यामध्ये शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांना टोला लगावला आहे. तर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या(political updates) जागावाटपावरुन संशय व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, “विधानसभा निवडणूकीत जागावाटपाची चर्चा 20 दिवस चालली. यात काही षडयंत्र होतं का. नाना पटोले, संजय राऊत हे चर्चा करत होते. आम्हीही होतो. पण जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते.

जागावाटपात इतका वेळ वाया घालवला, काही प्लानिंग होतं का? बैठक 11 वाजता असायची आणि यायचे दोन वाजता. अनेक नेते उशीरा यायचे. 20 दिवस हा घोळ चाचला. त्यामुळे फटका बसला. 20 दिवस जागावाटपात वेळ घालवण्यात काही षडयंत्र होतं का? यात वाव आहे,” असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरुन संशय व्यक्त केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये बिघाडी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांवर टीका केली आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना मित्रपक्षांवर जोरदार टीका केली. यावर देखील विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात 9 कोटी मतदार आहे तर 9 कोटी 16 लाख आले कुठून ? “झोल झालं” करून हे सरकार आले आहे. EVM च्या भरवश्यावर सरकार आले, पाश्वी बहुमत संदर्भात चर्चा करत आहे. कोल्हेंना एवढंच सांगतो त्यांनी स्वता:च्या पक्षाकडे जास्त लक्ष देऊन आम्हाला सल्ला कमी द्यावा,” असा टोला कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

बैठकीमध्ये खासदार अमोल कोल्हे म्हणाले की,”विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. तर पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे,” असे वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केले.

हेही वाचा :

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान चहलचा या आरजेसोबतचा फोटो व्हायरल, चाहते झाले चकित!

मविआत जुंपली, राऊतांनीही काडी टाकली, म्हणाले, “काँग्रेसनेच १७ दिवस घोळ..”

‘आठवड्यातून 90 तास काम करा’वरुन दीपिकाने थेट L&T अध्यक्षांना सुनावलं