David Warner ची बॅट तुटली अन् डोक्यात पडली Video Viral

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बीग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरच्या कर्णधार (Batting)डेव्हिड वॉर्नरने होबार्ट हरिकेन्स विरूद्ध तुफान फटकेबाजी केली. वॉर्नरने ६६ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी करत थंडरला १६४ धावांचा टप्पा गाठून दिला. या खेळीत वॉर्नरने एक मोठे योगदान दिले आणि संघाच्या विजयासाठी निर्धार धरला.

वॉर्नरची जबरदस्त खेळी

प्रथम फलंदाजी(Batting) करताना सिडनी थंडर्सने २० षटकांत ६ विकेट्स गमावल्या, पण वॉर्नरच्या तुफान फटकेबाजीने संघाला १६४ धावांचा टप्पा गाठला. सलामीवीर सॅम कॉन्स्टास फक्त ४ धावांवर बाद झाला आणि मॅथ्यू गिल्सही ४२ धावांवर माघारी परतला. वॉर्नरने ओलिव्हर डेव्हिससोबत १७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सॅम बिलिंग्ससोबत ३४ धावांची भागीदारी केली, पण बिलिंग्स १५.४ षटकांत बाद झाला.

वॉर्नरने ७ चौकारांसह ६६ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी केली आणि १६५ धावांचे लक्ष्य होबार्ट हरिकेन्स संघासमोर ठेवले.

विनोदी किस्सा

वॉर्नरने लेग साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता त्याची बॅट तुटली आणि बॅटचा तुकडा त्याच्या हेल्मेटवर आदळला. हा मजेदार किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

होबार्ट हरिकेन्सचा डाव

होबार्ट हरिकेन्स संघाने १६५ धावांचा पाठलाग करताना ७.३ व्या षटकात ६४ धावांवर ३ विकेट्स गमावल्या. मिचेल ओवेन (१३), मॅथ्यू वेड (१३), आणि चार्ली वाकिम (१६) बाद झाले. सध्या निखील चौधरी १८ व टीम डेव्हिड २ धावांवर नाबाद आहेत. या थरारक सामन्याने क्रिकेटप्रेमींना मोठा आनंद दिला आहे.

हेही वाचा :

नव्या वाहतूक धोरणाची भारतीयांमध्ये चर्चा; असे झाले तर, थेट ‘आयटी’तल्या नोकरीला ठोकणार रामराम

सोनू सूदच्या ॲक्शन लूकने चाहते झाले चकित, साऊथ सिनेमांनाही ‘फतेह’ने दिली टक्कर!

लिव्हर कॅन्सरच्या रुग्णांसाठी गूड न्यूज; शस्त्रक्रियेविना होणार उपचार