नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशातील लोकशाही संपणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशातील लोकशाही संपणार(country), असा घणाघात उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींवर केला आहे. लोकशाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला रोखठोक मुलाखत दिली आहे. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठीच हे महाभारत सुरू असल्याचं त्यांनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलं आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर(country) परखडपणे भाष्य केलं आहे. आतापर्यंत मोदींना महाराष्ट्रात जनतेचं प्रेम पाहायला मिळालं आहे. पूर्वीच्या महाभारतात द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. मात्र आता देशातील लोकशाहीचं होत आहे. तिला वाचविण्यासाठी हा लढा असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी अफाट प्रयत्न करून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. धनुष्यबाण ते मशाल, असे लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. संविधान पाळलं जात नसल्याची टीका यावेळी त्यांनी केली आहे.

महाभारतात लढा हा न्यायासाठी, सत्यासाठी झाला होता. त्यामध्ये अर्जुन आणि कृष्ण ही दोन प्रमुख पात्रं होती. विरोधक उद्धव ठाकरे अभिमन्यू झाला आहे, असं म्हणत आहेत. परंतु अभिमन्यू भेकड नव्हता. आज विरोधक ईडी, सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकत आहेत. परंतु ते भेकड लोकं आहेत. त्यांनी शिवसेना फोडली. ते बाहेर भाडोत्री लोकांना लढवत असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

कलह निर्माण करणं, ही कौरवनिती आहे. त्यामुळे नाश कौरवांचा होणार. देशात मोदी सरकार नकोय, भारत सरकार मला हवं आहे. मोदी संपूर्ण राज्यात फिरत आहेत. कदाचित ते गल्लीबोळामध्ये देखील रोड शो करतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे, तेव्हा त्यांना जनतेचा संताप कळेल. त्यांनी मोदी सरकारला गझनी सरकार म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

पुलवामा हल्ल्याला जबाबदार कोण? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. जर जम्मू काश्मिर अजूनही अशांत आहे. तर त्यांना मतं का द्यायची? काश्मीरमध्ये लष्काराचे बळी जात आहेत. हे चिंताजनक असल्याचं ठाकरेंनी सामनाशी बोलताना म्हटलं आहे. मणिपूर अशांत होऊन वर्ष लोटलं, परंतु अजूनही मोदी तिकडे गेले नाहीत. उद्धव ठाकरेंना संपवून मणिपूरच्या महिलांची इज्जत परत मिळणार आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं की, यांना राम राम आठवतो. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलाचं आंदोलन याकडे दुर्लक्ष आहे. लेह लडाख, अरूणाचलमध्ये चीन अतिक्रमण करत आहे. रस्ते बांधत आहे. आपल्या गावांची नावं बदलत आहे, तरीही सरकार काहीच वाटत नाही. नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्यास देशातील लोकशाही संपणार, असा उद्धव ठाकरेंचा घणाघात सामनाच्या मुलाखतीत पाहायला मिळाला आहे.

हेही वाचा :

ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा मोदींना पाठिंबा

मोबाईल गेमर्ससाठी आनंदाची बातमी! Microsoft जुलैमध्ये स्वतःचे मोबाईल गेम स्टोर लाँच करणार

सांगलीत संजयकाका जिंकणार, अजितदादांना चार जागा सुद्धा मिळणार नाहीत, अभिजीत बिचुकलेंचे धडाकेबाज अंदाज