अमेरिकेत रुग्णालयाच्या आवारातील गोळीबारात 4 ठार

United States

अमेरिकेत(United States) तुलसा येथील एका रुग्णालयाच्या आवारातील इमारतीमध्ये झालेल्या गोळीबारात किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार करणारी व्यक्तीही ठार झाला आहे.

त्याने स्वतःवरच गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली असावी, असे पोलीस डेप्युटी चीफ जोनाथन ब्रुक्‍स यांनी सांगितले. मात्र हल्लेखोर नक्की कशामुळे मरण पावला हे समजू शकलेले नाही. तसेच त्याने हा गोळीबार नक्की कशासाठी केला हे देखील समजू शकलेले नाही. ही घटना काल संध्याकाळी घडली.

गोळीबाराच्या या घटनेनंतर पोलिसांनी रुग्णालयातील प्रत्येक खोलीची कसून तपासणी केली(United States). या गोळीबारात अनेकजण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

नताली मेडिकल बिल्डींगमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांवरील उपचार होत असतात. मात्र या इमारतीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सेंट फ्रान्सिस हेल्थ सिस्टीमने ही इमारत बंद करून ठेवली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Smart News:-

मोदी सरकारच्या 8 वर्षात EDने टाकल्या किती धाडी?


महिला खासदाराच्या फोटोंनी चढवला इंटरनेटचा पारा..!


अखेर ‘त्या नराधमाला फांशीची शिक्षा!


विद्यापीठाच्या ‘त्या’ परीक्षा केंद्रावरील पेपर पुन्हा होणार: उदय सामंत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *