‘आप’ सरकारची मोठी घोषणा; दुकानांना मिळणार मोफत वीज कनेक्शन!

आयएनए मार्केट येथील विस्थापित काश्मिरी पंडितांच्या दुकानांना आता मोफत वीज कनेक्शन मिळणार आहे. आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) सरकारनं काश्मिरी पंडितांबाबत  ही मोठी घोषणा केली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी बीएसईएस  आणि पीडब्ल्यूडीसह  संबंधित विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ही घोषणा करण्यात आली आहे.

INA मार्केटमध्ये १०० हून अधिक दुकानं आहेत, जी विविध बांधकामांमुळं वर्षानुवर्षे स्थलांतरित करावी लागली. सध्या या दुकानांमध्ये विजेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना नसल्यानं दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांना काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळानं भेट दिली. यावेळी त्यांनी वीज कनेक्शनची समस्या सांगितली होती. दरम्यान या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री (aam aadmi party) अरविंद केजरीवाल यांनी मोफत वीज कनेक्शनची घोषणा केली आहे.

दिल्ली सरकारनं INA दुकानांमध्ये वीज जोडणी लावण्याचे काम सुरू केले असून १ महिन्याच्या आत येथील वीज कनेक्शन बसविण्याचे काम पूर्ण होईल. तसेच दुकानदारांकडून कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही. त्याचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, दिल्ली सरकार नेहमीच काश्मिरी पंडितांच्या हितासाठी उभं आहे. काश्मिरी पंडितांवर राजकारण करण्याऐवजी त्यांच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी आम्ही नेहमीच काम केले आहे. असेही ते म्हणाले.

हेही वाचा :


चोरट्या दारू वाहतुकीवर बोरगाव पोलिसांची दमदार कारवाई!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *