स्विस बँकेला मोठा आर्थिक फटका, 143 अब्ज डॉलरचे नुकसान

अनेक मोठ्या व्यक्तींचे आणि उद्योगपतींचे खातं असणाऱ्या स्विस बॅंकला इतिहासातला मोठा फटका बसला आहे. रॉयटर्स वृत्त संस्थेनं याबाबतील अधिक खुलासा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्विस बॅंकचे (swiss bank) नावं चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा या बॅंकेचे नाव चर्चेत आलं आहे. स्विस नॅशनल बँकेला गेल्या वर्षी मोठा आर्थिक फटका बसला आहे. बँकेने सोमवारी याविषयीची माहिती पोस्ट केली आहे. रॉयटर्स वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्विस नॅशनल बँकेला 2022 मध्ये 132 अब्ज स्विस फ्रँक म्हणजे 143 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. बँकेच्या 116 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे.

बँकेने याविषयी पोस्ट करताना म्हटले आहे की, स्टॉक आणि स्थिर उत्तपन्न बाजारातील घसणीमुळे त्यांचे शेअर्स आणि बाँड पोर्टफोलिआच्या मुल्याला नुकसान पोहोचले आहे. त्याचबरोबर मजबूत होत असलेल्या (swiss bank) स्विस फ्रँकचाही नकारात्मक परिणाम झाला आहे. फ्रँक वाढल्याने विदेशी चलन पोझिशनवर 131 अब्ज फ्रँक आणि स्विस फ्रँक पोझिशन्सवर 1 अब्ज गमावले. परिणामी स्विस बँक आता स्विस सरकार आणि सदस्य राष्ट्रांना नेहमीसारखे पेआउट करणार नाही.

प्राथमिक आकडेवारीचा हवाला देऊन स्विस नॅशनल बँकेने सोमवारी 2022 आर्थिक वर्षासाठी 132 अब्ज स्विस फ्रँक ($143 अब्ज) चे नुकसान नोंदवले. हे मध्यवर्ती बँकेच्या 116 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठे नुकसान दर्शवते आणि स्वित्झर्लंडच्या अंदाजे 18% 744.5 अब्ज स्विस फ्रँक्सच्या अंदाजे सकल देशांतर्गत उत्पादनाच्या बरोबरीचे आहे. 2015 मध्ये त्याचे पूर्वीचे रेकॉर्ड नुकसान 23 अब्ज फ्रँक होते.

अर्थतज्ज्ञ काय म्हणाले?
स्विस बँकेला नुकसान झाले असले तरीही या नुकसानीचा SNB धोरणावर परिणाम होण्याची शक्यता नाही. 2022 मध्ये चेअरमन थॉमस जॉर्डन यांनी उच्च स्विस चलनवाढ रोखण्यासाठी व्याजदरात तीन वेळा वाढ केली, असे विश्लेषकांनी सांगितले तर जे. साफरा सारासीन चे अर्थशास्त्रज्ञ कार्स्टेन ज्युनियस म्हणाले, एसएनबी (SNB) ची उच्च प्रतिष्ठाच तिला यामध्ये मदत करते की त्याला काहीही बदलण्याची गरज नाही.

हेही वाचा :