सराव थांबवला, प्रशिक्षकांना घरी पाठवले, भारताच्या ऑलिम्पिकपदक विजेतीचा राष्ट्रकुलपूर्वी छळ

भारताला ऑलिम्पिक पदक जिंकवून देणारी बॉक्सिंगपटू (boxer) लव्हलिना बोरगोहेनचा सध्याच्या घडीला मानसीक छळ सुरु करण्यात आला आहे. सध्या लव्हलिना ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ब्रिटनमध्ये दाखल झाली आहे. पण तिच्या एका प्रशिक्षकांनाच आता थेट घरी पाठवण्यात आले आहे. तर दुसऱ्या प्रशिक्षकांना तिच्याबरोबर राहण्याची परवानगी दिली देण्यात आलेली नाही. त्यामुळे लव्हलिनाने सराव करायचा तरी कसा, हा प्रश्न सध्याच्या घडीला तिच्यापुढे आहे.

लव्हलिनाने यावेळी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये तिने सांगितले आहे की, “आता, माझी प्रशिक्षिका संध्या गुरुंग या कॉमनवेल्थ व्हिलेजच्या बाहेर आहेत, कारण त्यांना प्रवेश करण्याची परवानगी नाही आणि माझे प्रशिक्षण खेळाच्या आठ दिवस आधी थांबवण्यात आले आहे. मी अनेक वेळा विनंती करूनही माझ्या इतर प्रशिक्षकाला भारतात परत पाठवण्यात आले आहे. (boxer) मी माझ्या खेळावर कसे लक्ष केंद्रित करावे हे मला समजत नाही. या परिस्थितीमुळे गेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्येही माझी कामगिरी खराब झाली.

या राजकारणामुळे माझीही राष्ट्रकुल स्पर्धा उद्ध्वस्त होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. मला आशा आहे की मी या राजकारणातून बाहेर पडून माझ्या देशासाठी पदक जिंकू शकेन. जय हिंद.”

महिलांच्या वेल्टरवेट विभागात जागतिक चॅम्पियन आणि अव्वल मानांकित बुसेनाझ सुरमेनेली हिच्याकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर लोव्हलिनाने टोकियो ऑलिम्पिकची मोहीम कांस्यपदकासह पूर्ण केली. विजेंदर सिंग (पुरुष मिडलवेट कांस्य, बीजिंग २००८) आणि मेरी कोम (महिला फ्लायवेट कांस्य, लंडन २०२१२) नंतर, ऑलिम्पिक पदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय बॉक्सर ठरली. पण सध्याच्या घडीला तिला प्रशिक्षणही मिळताना दिसत नाही. त्यामुळे खेळातले हे राजकारण थांबणार तरी कधी, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

लव्हलिनाने यावेळी सांगितले की, ” प्रत्येक वेळी ज्या प्रशिक्षकांनी मला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यास मदत केली त्यांना माझ्या प्रशिक्षण प्रक्रियेतून आणि स्पर्धेतून काढून टाकण्यात आले आहे. या प्रशिक्षकांपैकी एक आहेत संध्या गुरुंग जी, त्या द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त देखील आहेत. हजारो विनंत्या करूनही, त्यांना नेहमी माझ्या प्रशिक्षणासाठी उशिरा पाठवले जाते. यामुळे माझ्या प्रशिक्षणात अडथळा येतो आणि मला खूप त्रास आणि मानसिक छळ सहन करावा लागतो.”

हेही वाचा :


राज्यपाल, राज्यसभा सदस्य बनवण्याची बतावणी करत १०० कोटी लाटले

Leave a Reply

Your email address will not be published.