बँकसंबंधी या नियमात १ जानेवारीपासून बदल

पुढच्या वर्षीच्या पहिल्याच दिवशी अर्थात १ जानेवारीपासून बँकेशी संबंधित एका नियमात बदल होणार आहे. (bank rule) त्याचा थेट फायदा बँकेच्या ग्राहकांना मिळू शकेल. बँकेतील लॉकर वापरत असाल किंवा लॉकर भाड्याने घेण्याचा विचार करत असाल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अर्थात आरबीआयच्या लॉकरसंबधीच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे.

१ जानेवारी २०२३ पासून रीझर्व्ह बँक लॉकरशी संबंधित नियमात बदल करणार आहे. हा नियम लागू झाल्यानंतर बँकांना लॉकरबाबत मनमानी करता येणार नाही. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता संबंधित बँकेची असेल. (bank rule) याशिवाय आता ग्राहकांना ३१ डिसेंबरपर्यंत बँकेसोबत अॅग्रीमेंट करावा लागणार आहे. ग्राहकांना लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती एसएमएस आणि इतर माध्यमातून बँकेला द्यावी लागणार आहे.

नूतनीकरणासाठी करावा लागेल अॅग्रीमेंट

बँकेतील लॉकर घेतलेल्या ग्राहकांना नवीन लॉकर अॅग्रीमेंटसाठी पात्रता सिद्ध करावी लागणार आहे. १ जानेवारी २०२३ च्या आधी नुतनीकरणासाठी अॅग्रीमेंट करावा लागणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी बँकांकडून ग्राहकांना मेसेज पाठवण्यात येत आहेत. (Bank Rules)

बँक नुकसान भरपाई देणार

आरबीआयच्या नियमांनुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळं ग्राहकाच्या लॉकरमधील वस्तूचे किंवा दस्तावेजांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई बँकेला करावी लागणार आहे. संपूर्ण खबरदारी आणि सुरक्षेची जबाबदारी ही बँकांची असते. त्यासाठी आवश्यक सर्व पावले बँकांनी उचलली पाहिजेत. जर हे नुकसान बँकेच्या कर्मचाऱ्यांनी फसवणूक करून केले असेल तर, लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या रकमेच्या १०० पट भरपाई संबंधित बँकेला द्यावी लागणार आहे.

…तर नुकसान भरपाई मिळू शकेल

भूकंप, महापूर, वीज कोसळली, वादळ आदी नैसर्गिक संकटे, ग्राहकांची चूक किंवा निष्काळजीपणामुळं लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान झाल्यास त्यास बँक जबाबदार नसेल.

हेही वाचा :