मोठा दिलासा! एलपीजी सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त!

१९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात (commercial lpg cylinder price) कपात करण्यात आली आहे. १९ किलो वजनाचा सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. यामुळे आता दिल्लीत या सिलिंडरची किंमत २,२१९ रुपये, कोलकातामध्ये २,३२२ रुपये, मुंबईत २,१७१ रुपये आणि चेन्नईत २,३७३ रुपयांवर आली आहे. सिलिंडरचे कमी झालेले दर आज १ जूनपासून लागू झाले आहेत. दरम्यान, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
याआधी घरगुती गॅस सिलिंडरच्या (commercial lpg cylinder price) दरात वाढ झाली होती. १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत ३.५ रुपयांनी वाढली होती. यामुळे हा सिलिंडर १,००३ रुपयांवर पोहोचला आहे. याआधी १४.२ किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये होती. त्यात पुन्हा वाढ झाली आहे.
विनाअनुदानित गॅस सिलिंडर दरात वाढ होऊन काही दिवसही उलटत नाहीत, तोच सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा सिलिंडरचे दर साडेतीन रुपयांनी वाढविले होते. याआधी तेल कंपन्यांनी सिलिंडर दरात ५० रुपयांची वाढ केली होती तर त्यानंतर करण्यात आलेली वाढ साडेतीन रुपयांची होती.
हेही वाचा :