मोठी बातमी : सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने बजावली नोटीस!

शनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) (delhi politics news) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. तसेच सोनिया गांधी यांना 8 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही या प्रकरणाचा न घाबरता सामना करणार असून, सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील, असे सिंघवी यांनी सांगितले. हे प्रकरण 2015 मध्ये तपास यंत्रणेने बंद केले होते.(delhi politics news)

दरम्यान, ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मोदी सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. मनी लाँड्रिंग किंवा मनी एक्सचेंजचा कोणताही पुरावा नसल्याचे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात फक्त इक्विटीमध्ये रूपांतरण किंवा कर्ज असल्याचे सांगत आम्ही या प्रकरणी घाबरून न जाता खंबीरपणे लढा देणार असल्याचे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :


झटका! Airtel, Jio आणि VI या टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज महागणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *