इलॉन मस्क आणि गुगलचे सह-संस्थापक सर्गी ब्रिन यांच्या पत्नीचे प्रेम प्रकरण? मस्कने केला इन्कार मात्र…

ट्विटरबरोबरचा व्यवहार रद्द झाल्याचा वाद ताजा असतानाच इलॉन मस्क (Elon Musk) आता नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. इलॉन मस्क आणि गुगलचे सहसंस्थापक सर्गी ब्रिन यांच्या पत्नीचे प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या आरोपाने हा वाद निर्माण झाला आहे. मस्कने मात्र याबाबत स्पष्ट नकार देताना असे काहीही अजिबात नसल्याचे म्हटले आहे.
आपण बऱ्याच कालावधीपासून सेक्स केलेला नाही असे सांगत इलॉन मस्कने गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांच्या पत्नी निकोल शानाहान यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप करणारे वृत्त नाकारले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क कायम चर्चेत असतात. इलॉन मस्कविषयी काहीतरी वादंग नेहमीच तयार होताना दिसते.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका वृत्ता असा आरोप करण्यात आला आहे की इलॉन मस्कने(Elon Musk) शानाहानसोबतच्या अफेअरनंतर ब्रिनसोबतच्या मैत्रीत दरी निर्माण केली आहे. या वृत्तात “परिस्थितीशी परिचित” सूत्रांचा उल्लेख आहे ज्यांनी डब्ल्यूएसजेला सांगितले की या जोडप्याने म्हणजे गुगलचे सहसंस्थापक सर्गी ब्रिन आणि निकोल शानाहान या जोडप्याने या वर्षाच्या सुरूवातीस आपसातील मतभेदांमुळे घटस्फोटासाठी अर्ज केला होता.इलॉन मस्ककडून अफेअरचा इन्कार
आता, इलॉन मस्कने मात्र निकोलबरोबरच्या प्रेम प्रकरणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. मस्कने म्हटले आहे की ते आणि ब्रिन अजूनही मित्र आहेत आणि समोर आलेले वृत्त हे तिसऱ्याच कोणातरी व्यक्तीच्या ऐकीव माहितीतून पुढे आलेले आहे. “हे सर्व एकूणच निराधार आहे. सर्जी आणि मी मित्र आहोत आणि काल रात्री एकत्र पार्टीत होतो! मी निकोलला तीन वर्षांत फक्त दोनदा पाहिले आहे. तेही दोन्ही वेळा तिच्यासोबत इतर अनेक लोक असताना. यात काहीही रोमँटिक नाही,” असे मस्कने(Elon Musk) पोस्टमध्ये मस्कला टॅग करणारा वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात शेअर केलेल्या होल मार्स कॅटलॉग नावाच्या ट्विटर खात्याला प्रतिसाद देत ट्विट केले.
This is total bs. Sergey and I are friends and were at a party together last night!
I’ve only seen Nicole twice in three years, both times with many other people around. Nothing romantic.
— Elon Musk (@elonmusk) July 25, 2022
आपल्या चारित्र्यावरील हल्ले राजकीय हेतूने
“होय, या वर्षी चारित्र्य हल्ले एक नवीन स्तरावर पोचले आहेत. परंतु हे सर्व वृत्त किंवा लेख हे फक्त बर्गर आहेत. मी प्रचंड काम करतो, त्यामुळे शेननिगन्ससाठी जास्त वेळ नाही. या कथित गैरकृत्यांमध्ये सामील असलेल्या एकाही प्रमुख व्यक्तीची मुलाखतही घेण्यात आली नाही!” मस्कने दुसर्या हँडलला (टेस्ला हाइप) प्रतिसाद देत ट्विटरवर लिहिले आहे. या ट्विटर हॅंडलवरून मस्कवरील या वर्षीच्या मे महिन्यातील जुन्या ट्विटपैकी एक ट्विट मस्कने केले आहे. इलॉन मस्कने(Elon Musk) यात म्हटले आहे की त्याच्यावरील राजकीय हल्ल्यांची संख्या ही नाट्यमयरित्या वाढण्याची शक्यता आहे. ” हे सर्व आरोप आणि वाद अक्षरश: गुंडाळत मस्क शेवटी म्हटले आहे की “अनेक दिवसांपासून आपण सेक्स केला नाही”.
मस्कची अपत्ये
मस्क आणि क्लेअर बाउचर (ग्रिम्स) सोबत ब्रेकअप झाल्यानंतर मस्क आणि शानाहान यांचे अफेअर मियामीमधील आर्ट बेसल इव्हेंटमध्ये घडल्याचा आरोप WSJ च्या वृत्तात करण्यात आला आहे. सूत्रांनी डब्ल्यूएसजेला सांगितले की ब्रिन आणि शानाहान वेगळे झाले होते पण तरीही एकत्र राहत होते. इनसाइडरच्या एका वृत्तात या महिन्याच्या सुरुवातीला उघड झाले की मस्कला न्यूरालिंकमधील उच्च अधिकारी आणि टेस्लाचे माजी कर्मचारी शिवॉन झिलिस यांच्यापासून जुळी मुले होती. द व्हर्जने निदर्शनास आणल्याप्रमाणे मस्क आणि बाउचर यांना सरोगेटद्वारे दुसरे अपत्य होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी जुळी मुले जन्माला आली होती. यामुळे मस्कच्या ज्ञात मुलांची संख्या नऊ झाली होती”.
मस्क आणि सर्गीची मैत्री
WSJ च्या वृत्तात नमूद केले आहे की मस्क(Elon Musk) आणि ब्रिन हे जवळचे मित्र आहेत आणि ब्रिन यांनी टेस्लाला 2008 च्या मंदीच्या काळात 5,00,000 डॉलर निधीची ऑफर देखील दिली होती. 2015 मध्ये ब्रिनला मॉडेल X वापरणाऱ्या पहिल्या ग्राहकांपैकी एक बनवून मस्कने आपली मैत्री निभावली होती. WSJच्या वृत्तात असेही नमूद केले आहे की या वर्षाच्या सुरुवातीला एका पार्टीत ब्रिनची क्षमा मागण्यासाठी मस्कने गुडघे टेकले होते. अहवालानुसार, ब्रिन आणि मस्क हे आता “वारंवार” बोलत नाहीत आणि Google च्या सह-संस्थापकांनी त्यांच्या सल्लागारांना मस्कच्या कंपन्यांमधील त्यांची वैयक्तिक गुंतवणूक काढून घेण्यास सांगितले आहे.
हायवेवर एसटी चालकाला आली चक्कर, पुढे जे घडलं ते थरारक
एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का? अजित पवारांचा कडाडून हल्लाबोल
सराव थांबवला, प्रशिक्षकांना घरी पाठवले, भारताच्या ऑलिम्पिकपदक विजेतीचा राष्ट्रकुलपूर्वी छळ
‘आम्ही चिरफाड केली तर माफीवीरापासून सर्व बाहेर निघेल’; काँग्रेसचा थेट इशारा