रशियन तेल आयातीत दोन तृतीयांश कपात करणार युरोपीय संघ!

रशिया-युक्रेन युद्धाच्या 96 व्या दिवशी युरोपीय संघाने रशियाकडून करण्यात येणार्या खनिज तेलाच्या (mineral oil) आयातीत दोन तृतीयांश (66 टक्के) इतक्या मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा करार करण्यात आला असून, या निर्णयामुळे रशियावर युद्ध संपविण्यासाठी दबाव येईल, असे युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नेदरलँड सरकारी गॅस कंपनी ‘गॅसटेरा’ने रशियाच्या गॅजप्रोम कंपनीला (mineral oil) रूबलमध्ये व्यवहार करण्यास नकार दिला. त्यामुळे रशियाने मंगळवारपासून नेदरलँडचा गॅसपुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. नेदरलँडची ऊर्जेची 44 टक्के गरज नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे. तथापि, नेदरलँड रशियाकडून गरजेच्या केवळ 15 टक्केच नैसर्गिक वायूची आयात करत होता.
ही एकत्र येण्याची वेळ आहे. आपल्यातील मतभेदांमुळे रशियावरील निर्बंधांची गती कमी झाली आहे. युरोपीय संघाने मतभेद मिटवून रशियावर निर्बंध लावावेत, अशी मागणी झेलेन्स्की यांनी केली. दरम्यान, हंगेरीने रशियाविरोधातील तेल निर्बंधाला पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले आहे. सेवेरोडोनेटस्कच्या अर्ध्याभागावर रशियाने ताबा मिळविला आहे.
* युक्रेनच्या पुनर्उभारणीसाठी युरोपियन परिषद 9 बिलियन युरोची मदत करणार
* बेलारूस 22 जूनपासून युक्रेनसोबत युद्धसराव करणार
* युक्रेनला दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे देणार नसल्याचे बायडेन यांचे स्पष्टीकरण
* लुहान्स्कमधील हल्ल्यात फ्रान्सच्या पत्रकाराचा मृत्यू
हेही वाचा :