गॅस सिलिंडरवरील अनुदान आता विसरा; फक्त ‘या’ लोकांना मिळणार लाभ!
उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन मिळवणाऱ्या नऊ कोटी लाभार्थ्यांना सरकार (government subsidy) एलपीजी सबसिडी देत आहे आणि इतर लाभार्थ्यांना बाजारभावाने एलपीजी सिलिंडर घ्यावे लागतील. पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, जून 2020 पासून एलपीजीवर कोणतेही अनुदान दिले जात नाही.
अर्थमंत्र्यांनी केली ही घोषणा
21 मे रोजीच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना (government subsidy) अनुदान देण्याची घोषणा लागू केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा करण्याबरोबरच, सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरासाठी 12 गॅस सिलिंडरवर प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली.
सध्या 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1,003 रुपये आहे. परंतु प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक सिलिंडरचे बुकिंग झाल्यानंतर सरकार 200 रुपये सबसिडी पाठवेल.
या लोकांनाच अनुदान
उज्वला योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांना सिलिंडरची किंमत 803 रुपये असेल. 21 कोटींहून अधिक गॅस कनेक्शनधारकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत.
हेही वाचा :