VIDEO पाहून भावनाच गोठतील! लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन रस्त्यावर 2 तास बसला चिमुकला

आपल्या देशात सरकारी (government hospitals) रुग्णालयांमधील अस्वच्छता आणि सुविधांच्या अभावामुळे होणारे रुग्णांचे मृत्यू ही नवीन गोष्ट नाही. अनेकदा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी करत मृतदेह कुटुंबीयांना न सोपवल्याच्या आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने कुटुंबीयांनी मृतदेह मिळेल त्या वाहनाने किंवा खांद्यावर टाकून घरी पोहोचवल्याच्या हृदयद्रावक घटना आपण ऐकल्या पाहिल्या असतील.
अशीच एक घटना मध्य प्रदेशमधून उघडकीस आली आहे. मुरैना इथे शनिवारी एक 8 वर्षांचा मुलगा आपल्या 2 वर्षाच्या लहान भावाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन बसला होता. तर मुलाचे वडील पूजाराम जाटव मृत मुलाचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका शोधत होते.
मुरैना जिल्ह्यातील अंबाह भागातील बडफरा गावातील पूजाराम जाटव यांचा दोन वर्षांचा मुलगा राजा याची तब्येत अचानक बिघडली. सुरुवातीला पूजाराम यांनी आपल्या मुलाला घरीच बरं करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाला पोटदुखी असह्य झाल्याने त्यांनी त्याला मुरैना जिल्हा रुग्णालयात नेलं. त्यांचा मोठा मुलगा गुलशन हाही पूजारामसोबत रुग्णालयात गेला होता.
मात्र, मुरैना जिल्हा रुग्णालयात (government hospitals) राजाचा मृत्यू झाला. गरीब पूजारामने रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे मृतदेह परत गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची विनंती केली, परंतु त्यांनी त्याची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे पूजाराम आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन रुग्णालयाबाहेर आले आणि रस्त्यावर बसले. पंक्चरचे दुकान चालवणाऱ्या पूजाराम जाटव यांना रुग्णालयाकडून वाहन मिळाले नाही. दुसऱ्या वाहनाने घरी जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी आपला मोठा मुलगा गुलशनला मृतदेहासह हॉस्पिटलच्या बाहेर सोडलं आणि मुलाचा मृतदेह घरी नेण्याची व्यवस्था करण्यासाठी ते बाहेर पडले.
पूजाराम यांचा मोठा मुलगा गुलशन आपल्या मृत भावाचं डोकं त्याच्या मांडीवर घेऊन अर्धा तास तिथेच बसून होता. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांना मृतदेहासोबत बसलेला छोटा मुलगा दिसला आणि तिथे गर्दी जमली. त्या जमलेल्या गर्दीतील लोकांनी अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर पोलिसांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि मुलांसह पुजाराम जाटव यांनी घरी सोडण्यास सांगितलं.
पूजाराम जाटव यांनी आज तकला सांगितलं की, “मुलाची आई घरी नाही. मी गरीब माणूस आहे आणि माझ्या मुलाने काय खाल्लं आणि त्याची तब्येत बिघडली हे मला माहीत नाही. मी डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी मला इनो आणि हिंग द्यायला सांगितलं, मी मुलाला ते दिलं, पण त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मला हॉस्पिटलमधून अॅम्ब्युलन्ससाठी पैसे मागितले जात होते.” तर, याबाबत मुरैनाचे सिव्हिल सर्जन विनोद गुप्ता यांनी पूजाराम यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. आम्ही रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. गाडी येईपर्यंत मुलाचे वडील निघून गेले होते, असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेसची टीका
काँग्रेसने या घटनेचा व्हिडीओ ट्वीट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटलं की, “हे वेदनादायक चित्र भावनिक आहे आणि मध्य प्रदेशातील आरोग्य यंत्रणांचा संताप येणारंही आहे. मध्य प्रदेशात, एका आठ वर्षांच्या मुलाच्या हातात त्याच्या धाकट्या भावाचा मृतदेह आहे आणि वडील रुग्णवाहिका शोधण्यासाठी फिरत आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यवस्थेचे सत्य आहे.”
हेही वाचा :