10 वी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी, फक्त 20 रुपयांत असा करा अर्ज!

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या (government job opportunities) शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी खास आहे. तुम्ही ही संधी सोडू नका नाहीतर तुमचं नुकसान होईल. अवघ्या 20 रुपयात तुम्ही इथे अर्ज करू शकता. सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका.

पश्चिम बंगाल पोलीस भर्ती बोर्डने कोलकाता पोलीस कॉन्स्टेबलपदांसाठी जाहिरात काढली आहे. महिला आणि पुरुषांसाठी कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती आहे. इच्छुक तरुण यासाठी अर्ज करू शकतात. 27 जून अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

इच्छुक उमेदवारांनी wbpolice.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. 1410 रिक्त पदांसाठी अर्ज करण्यात येणार आहे. ज्यामध्ये 256 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत. इच्छुक उमेदवारांना 10 वी पास असणं आवश्यक आहे. त्यांचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त हवं तर 27 वर्षांपेक्षा कमी वय असायला हवं एवढीच अट आहे.(government job opportunities)

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एससी एसटी जातीसाठी फक्त 20 रुपये भरावे लागणार आहेत. तर बाकी उमेदवारांना 170 रुपये भरावे लागणार आहेत. प्राथमिक परीक्षा, पीएमटी, पीएसटी आणि मुख्य परीक्षा-मुलाखत अशी निवड होणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी wbpolice.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तिथे Recruitment वर क्लीक करावं. ‘Recruitment to the post of Constables and Lady Constables in Kolkata Police 2022 या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण माहिती भरा.

तुम्हाला या पोर्टलवर लॉगइन करावं लागेल. त्यानंतर तुमची सगळी माहिती द्यावी लागेल. त्यानंतर अर्ज भरता येईल. तुम्ही परीक्षा शुल्क भरून अर्ज जमा करू शकता. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका.

हेही वाचा :


बँकांच्या संपाबाबत मोठा निर्णय, युनियननी केली घोषणा!

Leave a Reply

Your email address will not be published.