कठीन काळात भारतानं दिली रशियाची साथ; आता पुतीन यांनी दिली मोठी ऑफर

Indian

चीनने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेला बुधवारी सुरुवात झाली आहे. व्हर्च्युअल पद्धतीने होत असलेल्या या 14 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी एक मोठे विधान केले आहे. “रशियामध्ये भारतीय(Indian) स्टोअर्स सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे, असे पुतीन यांनी म्हटले आहे.

ब्रिक्स परिषदेत बोलताना पुतिन म्हणाले, रशिया आणि ब्रिक्स देशांच्या व्यापारी समुदायांमधील संपर्क आता मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रशियामध्ये भारतीय स्टोअर्स(Indian) सुरू करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, कोणत्या भारतीय स्टोअरची चेन रशियामध्ये सुरू होईल, हे पुतीन यांनी स्पष्ट केले नाही.

पुतिन म्हणाले, चिनी कार, उपकरणे आणि हार्डवेअर देखील रशियन बाजारांत आणण्यासाठी चर्चा सुरू आहे. याच बरोबर, ब्रिक्स देशांमध्येही रशियाची उपस्थिती वाढत आहे, असेही पुतिन म्हणाले. ब्रिक्स पाच देशांची संघटना आहे. यात भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिकेचा समावेश आहे.

रशिया आणि ब्रिक्स देशांचा व्यापार 38 टक्क्यांनी वाढला –
पुतिन म्हणाले, 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत रशिया आणि ब्रिक्स देशांमधील व्यापार 38 टक्क्यांनी वाढला आहे. रशियाचा ब्रिक्स देशांसोबतचा व्यापार वाढून 45 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. रशिया ब्रिक्स देशांना तेला शिवाय, मोठ्या प्रमाणावर फर्टिलायझरची निर्यातही करत आहे. तसेच, रशियातील आयटी कंपन्या भारत आणि दक्षिण अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत, असेही पुतिन यांनी म्हटले आहे.

Smart News:-

संभाव्य सरकारमध्ये विनय कोरे, आबीटकर, आवाडेंच्या मंत्रीपदाची चर्चा!


जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान!


हनीमूनवर असताना पतिकडून झाली चूक, पत्नीचा वेदनादायक मृत्यू!


‘उद्धवजी, माझं घर तोडलं होतं तुम्ही…’ कंगनाचा तो व्हिडिओ पुन्हा चर्चेत!


Leave a Reply

Your email address will not be published.