राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आज भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. राणी एलिझाबेथ (queen elizabeth) द्वितीय यांनी सर्वाधिक काळ राज्य केलं आहे. जवळपास 70 वर्षे त्या ब्रिटनच्या राणी होत्या. दरम्यान, एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतानंही दु:ख व्यक्त केलं आहे.

भारतानं एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचे (queen elizabeth) आदेश दिलेत. भारताच्या गृह मंत्रालयानं हा आदेश जारी केलाय. आज संपूर्ण भारतात एक दिवसाचा शोक पाळला जाणार असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

 

queen elizabeth

आज देशभरात क्वीन एलिझाबेथ यांच्या स्मरणार्थ एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात य़ेत आहे. आज सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्या उंचीवर फडकण्यात येणार आहे. त्याचबरोबर आज मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेल नाही.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्या 96 वर्षांच्या होत्या. 70 वर्षे त्यांनी ब्रिटनवर राज्य केलं. राणी एलिझाबेथ यांनी स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला.

Smart News :