आंदोलन राहुल गांधींचे ;चर्चा काँग्रेसने ट्विट केलेल्‍या ‘त्‍या’ फोटोची

नॅशनल हेरॉल्‍ड प्रकरणी आज पुन्‍हा एकदा सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्‍या हंगामी अध्‍यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी केली. याविरोधात काँग्रेस नेता (rahul gandhi) राहुल गांधी यांच्‍यासह पक्षाच्‍या खासदारांनी केंद्र सरकारच्‍या निषेधार्थ आंदोलन केले. पोलिसांनी त्‍यांना विजय चौक येथे ताब्‍यात घेतले. यावेळी राहुल गांधी यांनी थेट रस्‍त्‍यावर ठाण मांडले. यानंतर काँग्रेस पक्षाने त्‍यांची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍या तुलना एक फोटो शेअर केला असून, याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

‘ईडी’ चौकशीचा निषेध करत केंद्र सरकारकडूक केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्‍याचा आरोप काँग्रेस खासदारांनी केला. त्‍यांनी राष्‍ट्रपती भवनावर मोर्चो काढण्‍याची तयारही केली. याचचेळी विजय चौकमध्‍ये त्‍यांना अडकविण्‍यात आले. येथे राहुल गांधी यांच्‍यासह काँग्रेस खासदारांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. यावेळी (rahul gandhi) राहुल गांधी म्‍हणाले की, आम्‍हाला शांततापूर्ण आंदोलन करण्‍यापासून रोखले जात आहे. येथे पोलीसराज आहे. हेच भारताचे आजचे वास्‍तव आहे. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी व अन्‍य खासदारांना पोलिस बसमधून आंदोलनस्‍थळापासून हलवले.

काँग्रेस पक्षाचे ट्विट चर्चेत
राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले. यानंतर काँग्रेस पक्षाच्‍या वतीने एक ट्विट करण्‍यात आले. यामध्‍ये एक फोटो आणि कवितेचा उल्‍लेख आहे. इंदिरा गांधी यांच्‍या सारखेच राहुल गांधी यांनी आंदोलन केले असून यापुढे राहुल गांधी हेही इंदिरा गांधी यांच्‍या सारखेच आक्रमक रुप धारण करतील, असे संकेत दिले आहे.

काँग्रेसचे राज्‍यसभा खासदार जयराम रमेश यांनी ट्विट केली की, “काँग्रेस खासदार विजय चौक ते राष्‍ट्रपती भवनपर्यंत मोर्चा काढण्‍यास पोलिसांनी मज्‍जाव केला. जबरदस्‍तीने ताब्‍यात घेतले. आम्‍ही आता पोलिसांच्‍या बसमध्‍ये आहोत. आम्‍हाला कोठे घेवून जाणार हे केवळ पंतप्रधान आणि केंद्रीय गृह मंत्री यांनाच माहिती आहे.”

हेही वाचा :


धक्कादायक! मुलगी नको म्हणून गर्भ कापून बाहेर काढला

Leave a Reply

Your email address will not be published.