रशिया-युक्रेन युद्ध संपणार? पुतिन यांनी केलं मोठं वक्तव्य

गेले दहा महिने सुरु असलेल्या रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धामध्ये आता रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही युद्ध संपवण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहोत पण युक्रेन आणि अमेरिका त्यासाठी तयार नाही. रशियाचे लक्ष्य युद्ध वेगाने संपविण्याकडे आहे असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुतिन यांनी युद्ध लवकर संपण्याचे संकेत दिले आहात का की युक्रेनच्या शरणागती न पत्करण्याच्या भूमिकेमुळे युद्ध सुरुच राहिल याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.

व्लादमिर पुतिन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमचं रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युदध लवकरात लवकर संपवण्याकडे लक्ष्य आहे. त्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेत आहोत. आम्ही प्रयत्न करणार हे युद्ध शक्य तेवढ्या लवकर संपावे आणि तेवढे चांगलेच होईल. पुढे पुतिन म्हणाले, सर्व संघर्ष कोणत्या ना कोणत्या प्रकारे संपतात किंवा चर्चा करुनही तोडगा निघतो. त्यामुळे जेवढं युक्रेन ही गोष्ट समजेल तेवढं चांगलेच होईल.

दरम्यान मॉस्कोच्या लष्करी प्रमुखांनी म्हटले आहे की, रशियाचे सैन्य आता पूर्वेकडील डोनेटस्क क्षेत्रावर नियंत्रण मिळविण्यासाठी सज्ज झाले आहे, जिथे बाखमुत शहर लढाईचे केंद्र बनले आहे. दुसरीकडे, मॉस्कोमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनी अलिकडच्या काही महिन्यांत वारंवार सांगितले आहे की, ते युक्रेनशी चर्चा नाकारत नाहीत. त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना दोष दिला आहे. झेलेन्स्की यांनी पुतिन सत्तेत असेपर्यंत आम्ही चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा :