शाहीन आफ्रिदीच्या दुखापतींचे सत्र सुरूच हॉस्पिटलमध्ये दाखल

कराची: टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानसोबत एक दुर्घटना घडली ती म्हणजे शाहीन आफ्रिदीची (injury)दुखापत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने सामन्यानंतर सांगितले की शाहीन आफ्रिदीने त्याचे षटक पूर्ण केले असते आणि सामन्यात शेवट्पर्यंत राहिला असता तर पाकिस्तानने तो सामना जिंकला असता. मात्र शाहीन आफ्रिदीच्या या दुखापतींचे हे सत्र सुरूच आहे. आफ्रिदी अजूनही गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही की रविवारी अचानक त्याला रुग्णालयात दाखल केले.

टी-२० विश्वचषकातून परतल्यानंतर आफ्रिदी विश्रांतीवर होता. गुरुवारीच आफ्रिदी माजी कर्णधार इंझमाम-उल-हकच्या मुलीच्या विवाहसोहळ्यात दिसला होता. मात्र रविवारी अचानक पोटात दुखू (injury)लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

आफ्रिदीला अपेंडिक्सच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. याचा अर्थ असा की, आफ्रिदी आता एप्रिल २०२३ पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता नाही, म्हणजेच तो मायदेशात इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांना मुकणार आहे. शाहीन आफ्रिदी बराच दुखापतींशी झुंजत होता.
तथापि, नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो पुनरागमन करण्यात यशस्वी झाला, परंतु इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात संघाला त्याची सर्वाधिक गरज असताना त्याची दुखापत पुन्हा निर्माण झाली. आणि त्याला त्याच्या कोट्यातील ११ महत्त्वाचे चेंडू टाकता आले नाहीत, ज्यामुळे पाकिस्तानी संघाचे बरेच नुकसान झाले आणि आता एक समस्याही पूर्णपणे सुटली नव्हती की आता त्याला एका नव्या समस्येने घेरले आहे.

हेही वाचा: