भारतीय लष्कराच्या गाडीला भीषण अपघात, 16 जवान शहीद

सिक्किममधून (Sikkim) एक दुर्देवी घटना समोर आली आहे. उत्तर सिक्किममध्ये भीषण अपघात झाला आहे. भारतीय सेनेची (Indian Army) एक बस खोल दरीत कोसळली. यात 16 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. नॉर्थ सिक्कीममध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात (indian army) भारतीय लष्कराच्या जवानांच्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे.

जवानांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबियांना माझ्या संवेदना. जखमी जवान लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं.