युक्रेनवरचा धोका वाढला, रशियाकडून मिसाईलचा पाऊस

satellite photo russia and ukrin war

आज रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine war) 16 वा दिवस आहे. मात्र युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांची नजर युक्रेनची राजधानी कीववर आहे. रशियन सैन्य आता दोन बाजूंनी कीवला घेरलं आहे. यासोबतच राजधानी कीववर टँकविरोधी गाईडेड मिसाईल्सचे हल्ले तीव्र झाले आहेत. त्याचवेळी रशियन सैन्य उत्तरेकडील इरपिन आणि पूर्वेकडील ब्रोवरी येथे सतत हल्ले करत आहे. दुतर्फा हल्ल्यांनी युक्रेन हादरलं  (satellite photo) आहे.

रशिया युक्रेनवर रणगाडे, पॅराट्रूपर्स, पायदळ, अँटी-टँक गाईडेड मिसाईल्ससह हल्ला करत आहे. या प्रकरणी युक्रेननं ब्रोवरीमध्ये रशियाला चोख प्रत्युत्तर देताना रशियाचे 5 रणगाडे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

एका खासगी अमेरिकन कंपनीनं आदल्या दिवशी एक सॅटेलाइट इमेज जारी केली आहे. युद्धाच्या सुरूवातीस, राजधानी कीव सुमारे 60 किमीच्या परिसरात रशियन सैन्यानं वेढलं होतं. जे मोठ्या प्रमाणात मध्यभागी विखुरलेले होते. मात्र आता पुन्हा रशियन सैन्य तैनात करण्यात आले आहे. सॅटेलाइट फोटो (satellite photo) मोठा रशियन लष्करी काफिला दाखवतात. ते शेवटचे कीवच्या वायव्येस अँटोनोव्ह विमानतळाजवळ पाहिलं होतं.

यूएस-आधारित खाजगी कंपनी मॅक्सार टेक्नॉलॉजीने सॅटेलाइट फोटो जारी केल्यात असं म्हटलं आहे. या सॅटेलाइट फोटो जारी करताना म्हटलं की, बख्तरबंद युनिट्स विमानतळाजवळील शहरांमध्ये घुसखोरी करत आहेत. तसंच ताफ्यासमोर उत्तरेकडील लुब्यांकाजवळ तोफा गोळीबाराच्या स्थितीत आहेत.


हेही वाचा :


कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठात राज्यपालांचा तीव्र निषेध..!


“फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात..!


भाड्यानं खोली मागायला आले अन् महिलेसोबत घडला विचित्र प्रकार

Leave a Reply

Your email address will not be published.