क्रॅश टेस्टच्या आधारे वाहनांना मिळणार ‘स्टार रेटिंग’ : नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भारत-एनसीएपी  प्रोग्राम लॉन्च करण्याच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत कारला त्यांच्या क्रॅश (crash test) चाचणीतील कामगिरीच्या आधारे स्टार रेटिंग दिले जाणार आहे. नितीन गडकरींनी या वर्षी मार्चमध्ये संसदेत भारत-एनसीएपीबद्दल माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अंतर्गत कारच्या स्टार रेटिंगची चाचणी आणि मूल्यांकन करण्यासाठी एक योजना तयार करत आहे आणि त्यासाठीच्या प्रस्तावावर काम करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज या प्रोग्रॅमच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे.

ट्वीटरद्वारे गडकरींची माहिती

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत याबाबत माहिती दिला आहे. यामध्ये भारत-NCAP हे ग्राहक केंद्रित व्यासपीठ असेल, जे ग्राहकांना स्टार रेटिंगवर आधारित सुरक्षित कार निवडण्यास सक्षम करेल. सुरक्षित वाहने आणि विविध पॅरामीटर्सवर नवीन कार मॉडेल्स तयार करण्यासाठी भारतातील ऑटोमेकर्समध्ये चांगल्या स्पर्धेला प्रोत्साहन देण्याचे काम करेल. क्रॅश चाचणी (crash test) कार्यक्रमाद्वारे भारतीय गाड्यांना दिलेले स्टार रेटिंग केवळ कारमधील संरचनात्मक आणि प्रवासी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीच नव्हे तर, भारतीय वाहनांच्या निर्यात-योग्यतेसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे असेल असेही गडकरी यांनी यावेळी म्हटले आहे.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं पावलं

भारत-NCAP कार्यक्रमाचे चाचणी प्रोटोकॉल जागतिक क्रॅश चाचणी प्रोटोकॉलशी संरेखित केले जातील आणि वाहन निर्मात्यांना भारतातील त्यांच्या स्वत:च्या घरातील सुविधांवर वाहनांची चाचणी करण्याची परवानगी देईल. भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही गडकरींनी यावेळी स्पष्ट केलं. भारताला जगातील नंबर एक ऑटोमोबाईल हब बनवण्याच्या मिशनमध्ये हे एक महत्त्वाचे साधन ठरेल असा विश्वासही यावेळी गडकरींनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.