व्हायरल व्हिडिओ : हत्तीच्या कळपाची पिल्लाला Z+++ सुरक्षा!!!

काही प्राण्यांच्या कळपात पिल्लांची काळजी संपूर्ण कळप घेतो. असाच एक हत्तींच्या कळपाचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. यात एक हत्तीचा कळप रस्त्यावरुन चालत आहे. या कळपातून मधोमध सुरक्षितपणे (elephant) हत्तीचे पिल्लू चालत असल्याचे दिसते. जशी व्हीआयपी व्यक्तींना झेड प्लस सुरक्षा दिली जाते तसा हा हत्तींचा कळप पिल्लाला कळपात मधोमध घेऊन रस्त्यावरुन जंगलाच्या दिशेने जाताना दिसत आहे.

हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. “पृथ्वीवरील कोणीही या (elephant) हत्तीच्या कळपापेक्षा चांगली सुरक्षा या गोंडस नवजात पिल्लाला देऊ शकत नाही. ही तर Z+++ सुरक्षा आहे. हे दृश्य आहे सत्यमंगलम कोइम्बतूर रस्त्यावरील असल्याचे समजते.” अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटिझन्सनी या गोंडस हत्तीच्या पिल्लाच्या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “खूपच सुंदर, हत्तींचे इतके घट्ट नाते असते की कळपातील प्रत्येक मादी ही हत्तींच्या सर्व पिल्लांची आई असते. ते त्यांच्या पिल्लांचे खूप चांगल्यारितीने संरक्षण करतात. असेच या व्हिडिओतून दिसत असून देव त्यांना आशीर्वाद देवो.” असे एका यूजरने व्हिडिओवर ट्विट केले आहे. या व्हिडिओ साडेतीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.